उमेश पाल हत्या प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी गँगस्टर अतिक अहमदला यूपी पोलिस अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून रविवारी सायं. ५.४४ वाजता बाहेर घेऊन गेले. यूपी एसटीएफच्या ४५ सदस्यीय टीम त्याला प्रयागराजला घेऊन जात आहे.(UP cops take Atiq Ahmed custody from Gujarat Sabarmati central jail, start for 1 300km journey to Prayagraj )
अतीकला प्रयागराजच्या एमपी-एमएलए कोर्टाने मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर केले जाईल. अतिकविरुद्ध सुमारे १०० प्रकरणे सुरू आहेत. त्यापैकी एकात २८ मार्चला शिक्षा सुनावली जाईल. अतीकने २००६ मध्ये उमेश पालचे अपहरण केले होते.
उमेशने माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफविरुद्ध अपहरणाचा तक्रार दिली होती. अतिकची पत्नी शाइस्ता परवीन बेपत्ता आहे. तिचा बुरख्या नसतानचा फोटो उपलब्ध नाही.
अतिक अहमद, उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. चार दशकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६० वर्षीय अतिक अहमदला स्वतःच्याच राज्यातून पळ काढावा लागला आहे. ज्याने राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रात एकाचवेळी हुकूमत गाजवली.
गुन्हेगारीचा शिक्का आणि १०० च्या आसपास खटले आणि १४४ गुंडांची टोळी चालवत असतानादेखील त्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत निवडणूक जिंकत होता.
योगी आदित्यनाथ सरकार आपला एनकाऊंटर करेल, या भीतीपोटी अतिक अहमदने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याला गुजरातच्या तुरुंगातच ठेवावे, अशी विनंती केली आहे.
कृषी संस्थेच्या एका प्राध्यापकावर हल्ला केल्याप्रकरणी २०१६ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला २०१९ मध्ये गुजरातमधील तुरुंगात हलविण्यात आले.
अतिक अहमदचे गुन्हेगारी किस्से एखाद्या चित्रपटापेक्षा कमी थरारक नाहीत. डिसेंबर २०१८ रोजी अतिक युपीमधील देवरियाच्या तुरुंगात कैद होता. तिथे त्याने मोहित जयस्वाल नावाच्या व्यावसायिकाला भेटायला बोलावले. नंतर कळले की, जयस्वालला बळजबरीने उचलून तुरुंगात आणले होते.
तिथे त्याला मारहाण करून त्याची ४८ कोटी रुपयांची जमीन अहमदच्या सहकाऱ्यांच्या नावावर करण्यासाठी कागदपत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली.
नुकतेच २४ फेब्रुवारी रोजी, बसपाचे माजी आमदार रमेश पाल हत्याकांड प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची अतिक अहमदच्या गुंडांकडून दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार रमेश पाल हत्याकांड प्रकरणात अतिक अहमद हा मुख्य आरोपी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.