Swami Prasad Maurya: देवी लक्ष्मीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. लखनऊमधील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने शनिवारी वजीरगंज पोलीस ठाण्याला स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.(Up Court Orders Case File Against Swami Prasad Maurya Over Controversial On Goddess Lakshmi How Can Lakshmi Be Born With Four Hands)
हिंदू देवी-देवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या नेत्याला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. देवी-देवतांविरोधात वक्तव्य करून लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपांखाली सपाचे माजी सरचिटणीस आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
न्यायालयाने वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींना संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सात दिवसांत एफआयआरची प्रत न्यायालयात पाठवण्यास सांगितले आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर लक्ष्मी देवीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.
विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस मौर्य यांच्या विरोधात तसेच प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारदार रागिणी रस्तोगी यांनी आरोप केला आहे की, गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
रस्तोगी यांच्या तक्रारीनुसार, मौर्य यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, जेव्हा विविध धर्माचे लोक दोन हात आणि दोन पाय घेऊन जन्माला येतात, तेव्हा लक्ष्मी चार हातांनी कशी जन्माला येऊ शकते. मौर्य यांनी अनेक प्रसंगी असे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
यापूर्वीही स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू आणि सनातनीच्या धार्मिक भावना भडकावणाऱ्या अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अहवाल मागवला होता.
१२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो एक्सवर शेअर केले . तसेच हे फोटो शेअर करताना त्यांनी देवी लक्ष्मीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
"दीपोत्सवानिमित्त मी माझ्या पत्नीची पूजा आणि तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे आणि नाक, एक डोकं, एक पोट आणि एक पाठ असते. परंतु, चार हात, आठ हात, दहा हात, वीस हात, हजार हात असलेलं मूल अद्याप या जगात जन्माला आलेलं नाही. मग चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते? तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा. कारण ती तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करते, घरात सुख-समृद्धी नांदेल याची काळजी घेते. तसेच ती आपली जबाबदारी पार पाडते".
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.