CM Yogi : उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी; 9 कंपन्यांवर FIR

CM Yogi : उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी; 9 कंपन्यांवर FIR
Updated on

Uttar Pradesh Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. हलाल प्रमाणित असलेल्या उत्पादनांची विक्री राज्यामध्ये करता येणार नाही. तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत.

सरकारच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित असलेले उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे काही कंपन्या दैनंदिन गरजेची उत्पादनं हलाल असल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांची विक्री करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. विशिष्ट उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी असे प्रकार केले जात होते.

लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यामध्ये हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीसंबंधी एफआयआर दाखल झाला होता. शैलेंद्र शर्मा नावाच्या व्यावसायिकाने ही तक्रार दिलेली होती. त्यावरुन हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई, जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट दिल्ली, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया मुंबई आणि जमियत उलेमा, मुंबई यासह अन्य कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

CM Yogi : उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी; 9 कंपन्यांवर FIR
Madhya Pradesh Election : चर्चा एकच... सरकार कोणाचं? अटीतटीमुळे कोणालाही अंदाज येईना

हलाल प्रामाणिकरण हे दुग्धजन्य पदार्थ, मसाले, साबण या उत्पादनांसाठी जारी केले जायचे. विशिष्ट उत्पादन हलाल प्रमाणित असल्याचं सांगून विक्री केली जात होती. या कंपन्यांवर बेकायदेशीरपणे काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली.

CM Yogi : उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी; 9 कंपन्यांवर FIR
दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना पदावरुन हटवण्याची मागणी; चौकशी अहवाल नायब राज्यपालांकडे सादर

या प्रकरणात आता राजकारण तापू लागलेलं आहे. हलाल प्रमाणपत्र जारी करणं ही फसवणूक असल्याचं सांगत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावता येणार नाहीत, असं भाजपने म्हटलं आहे. तर समाजवादी पक्षाने सरकारवर आरोप करत भेसळखोर सरकार असल्याचं म्हणत हे सगळं सरकारच्या डोळ्यासमोर कसं होत होतं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.