Gas Cylinder: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यातील सरकार देणार मोफत गॅस सिलिंडर, खात्यात येणार 914 रुपये

Gas Cylinder: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
LPG Gas Cylinder
LPG Gas Cylinder Esakal
Updated on

Gas Cylinder: उज्ज्वला योजनेच्या 1.75 कोटी लाभार्थ्यांना दोन मोफत LPG सिलिंडर देण्याऐवजी, उत्तर प्रदेश सरकार त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचा विचार करत आहे. एका सिलिंडरसाठी 914.50 रुपये मोजावे लागतील.

या दिवाळीत खात्यावर पहिला हप्ता पाठवण्याची योजना आहे. यासाठी लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी जोडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. असे वृत्त हिंदी न्यूजपोर्टलने दिले आहे.

सत्ताधारी पक्ष भाजपने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोन मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीच्या निकालानंतर दोनदा होळी आणि एकदा दिवाळीला मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते.

LPG Gas Cylinder
Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

मात्र, या आश्वासनाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. वाढणारी महागाई आणि येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचा विचार सरकार करत आहे..

LPG Gas Cylinder
Tax on Gifted Stocks: तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर्स गिफ्ट केलेत का? तर भरावा लागेल टॅक्स, काय आहे नियम?

1, 144 रुपयांच्या किरकोळ सरासरी सिलिंडरच्या किंमतीत केंद्र सरकारकडून 230 रुपयांची सबसिडी आणि बँक विनिमय दर वजा करून सुमारे 914.50 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्येच पैसे दिले जातील, असा निर्णय सरकारने घेतला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()