CAA Protest : UP सरकारकडून वसूली नोटिसा मागे घेण्याचा निर्णय

सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत या नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या.
suprem court
suprem court Sakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने CAA विरोधी आंदोलकांना पाठवलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारने ही कारवाई करत प्रशासनाने 274 जणांना वसुलीच्या नोटिसा पाठवल्या होत्या. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेश सरकारला फटकारले होते. (UP Govt Drops Recovery Notices To Anti CAA Protesters)

राज्य सरकारने 14 आणि 15 जानेवारी रोजी सर्व 274 नोटिसा मागे घेण्याचे आदेश जारी केले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारचे वकील गरिमा प्रसाद यांनी सांगितले आहे. 2019 मध्ये 274 जणांविरोधात पाठविण्यात आलेल्या जारी केलेल्या नोटिसा मागे घेतल्याचे यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे. तसेच त्यांच्यावरील कारवाई देखील मागे घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.