UP Lok Sabha Election 2024: UP मध्ये काँग्रेससोबतची मैत्री सपाला महागात पडणार? इतिहास काय सांगतो?

UP Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा मोठा राजकीय इतिहास आहे. समाजवादी पक्षाची काँग्रेससोबतची युती अनेकवेळा झाली आणि अनेकदा तुटली.
rahul gandhi and akhilesh yadav
rahul gandhi and akhilesh yadav
Updated on

UP Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा मोठा राजकीय इतिहास आहे. समाजवादी पक्षाची काँग्रेससोबतची युती अनेकवेळा झाली आणि अनेकदा तुटली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा इंडिया आघाडी मैदानात उतरली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा हातमिळवणी केली आहे.

अनेक बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. समाजवादी पक्ष काँग्रेसला 17 जागा देत आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेसला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळणे म्हणजे चमत्कारच आहे. त्याचं कारण म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी आपला बालेकिल्ला अमेठी गमावला आहे.

सोनिया गांधी (sonia gandhi) खासदार असलेल्या रायबरेलीमधूनच काँग्रेस जिंकली होती. साहजिकच या आघाडीचा सपाला फारसा फायदा होताना दिसत नसला तरी काँग्रेसचा जनाधार वाढू शकतो. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सपा एकत्र आले होते. या यावेळी काँग्रेसला 105 जागा मिळाल्या. मात्र काँग्रेसला फक्त 7 जागा जिंकता आल्या. अशा परिस्थितीत सपाही काँग्रेसला वाचवू शकलेली नाही. त्यामुळए यावेळी त्यांच्या मैत्रीचा काय परिणाम होतो हे पाहणे बाकी आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपासोबत युती केली होती. याचा परिणाम असा झाला की, स्वतः मजबूत स्थिती असलेली सपा केवळ 5 जागांवरच मर्यादित राहिली पण मायावतींचे 12 खासदार विजयी झाले. मुस्लिम व्होटबँकेवर सपाची मजबूत पकड आहे. ओबीसींचा मोठा वर्ग सपाला मत देतो. सपासोबत काँग्रेसची युती झाल्यास तो भाग काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतो पण काँग्रेसचे निष्ठावंत मतदार आता राहिले नाहीत, अशी चर्चा आहे.

rahul gandhi and akhilesh yadav
Lasya Nanditha: कारवरचं नियंत्रण सुटलं अन्...; महिला आमदाराचा अपघातात जागीच मृत्यू

विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही काँग्रेसची मात्र दुरवस्था झाली. अजूनही परिस्थिती बदललेली नाही. भाजप ठिकठिकाणी निवडणूक रॅलींच्या मूडमध्ये असताना राहुल गांधी भारत न्याय यात्रा काढत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी यांच्यासारखे नेते उत्तरप्रदेशच्या भूमीपासून दूर आहेत. अशा परिस्थितीत त्यांना सपाच्या मेहनतीचा फायदा होताना दिसत असला तरी त्यांच्या मेहनतीचा फायदा सपाला मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे. (Latest Marathi News)


2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती अखिलेश यांच्यासोबत होऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या आघाडीचा फायदा काँग्रेसला होतोय, पण अखिलेश यांना किती फायदा होतोय हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

rahul gandhi and akhilesh yadav
Amit Thackrey in Pune: लोकसभेच्या तोंडावर अमित ठाकरे का उतरले पुण्याच्या रस्त्यांवर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.