BJP Lok sabha election 2024 : पराभवामुळे भाजप बेचैन.. कारणं शोधण्यासाठी 'टास्क फोर्स', हक्काचा मतदार का दुरावला?

२०१९ मध्ये ज्या उत्तर प्रदेशातून भाजपला ६२ जागांवर विजय मिळवता आला होता. त्याच उत्तर प्रदेशात भाजपला मतदारांनी २०२४ मध्ये ३३ जागांवर रोखले आहे. उत्तर प्रदेशात हक्काचा मतदार का दुरावला याची कारणं शोधण्यासाठी भाजपकडून टास्क फोर्स नियुक्त करण्यात येत आहे.
JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha
JP Nadda, Narendra Modi and Amit ShahaSakal
Updated on

Loksabha election results 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी चारशेपारचा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेलं नाही. एनडीएमधील घटकपक्षांच्या बळावर भाजपने केंद्रामध्ये सत्तास्थापन केली आहे.

२०१९ मध्ये ज्या उत्तर प्रदेशातून भाजपला ६२ जागांवर विजय मिळवता आला होता. त्याच उत्तर प्रदेशात भाजपला मतदारांनी २०२४ मध्ये ३३ जागांवर रोखले आहे. उत्तर प्रदेशात हक्काचा मतदार का दुरावला याची कारणं शोधण्यासाठी भाजपकडून टास्क फोर्स नियुक्त करण्यात येत आहे.

JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha
Nagpur Blast: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू, सात जण जखमी

उत्तर प्रदेशात भाजपला ग्राफ खालच्या दिशेने का येतोय? याची कारणं पक्षाकडून शोधली जाणार आहेत. बुधवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि महामंत्री धर्मपाल यांनी घटलेल्या मतांबद्दल चर्चा केली.

JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha
Hamare Baarah: सौंदर्यामुळे अनेकवेळा झाली रिजेक्ट, पहिल्याच चित्रपटामुळे येतायत बलात्काराच्या धमक्या; अभिनेत्रीनं सांगितले धक्कादायक अनुभव

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश भाजपने वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सचं गठण करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये पदाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असेल. त्यासाठी ६० पेक्षा जास्त सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.