Magic Mirror Scam : लोकांना विवस्त्र दाखवणारा 'जादूचा आरसा', 9 लाख रुपये किंमत; काय आहे हा नवा स्कॅम?

Scam News : अमेरिकेतील 'नासा'चे वैज्ञानिकही याचा वापर करतात, असं आरोपींनी म्हटलं होतं.
Magic Mirror Scam
Magic Mirror ScameSakal
Updated on

आतापर्यंत तुम्ही आयफोन, किंवा अन्य वस्तू घेताना लोकांची फसवणूक झालेलं ऐकलं असेल. मात्र उत्तर प्रदेशातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जादूचा आरसा विकण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला तब्बल 9 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा आरसा समोरच्या व्यक्तीला नग्न दाखवतो, असं या व्यक्तीला सांगण्यात आलं होतं.

या प्रकरणी ओडिशामधील नायापल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पार्था सिंघरे, मोलाया सरकार आणि सुदिप्ता सिन्हा रॉय अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघेही पश्चिम बंगालचे राहणारे होते. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राहणाऱ्या अविनाश कुमार शुक्ला याला या तिघांनी हा कथित जादूचा आरसा विकला होता.

Magic Mirror Scam
Soccer Betting App Scam : चिनी व्यक्तीने गुजरातमध्ये उभारलं फुटबॉल बेटिंग अ‍ॅपचं जाळं; 9 दिवसांत लुटले 1,400 कोटी रुपये!

या तिघांकडून पोलिसांनी एक कार, 28 हजार रुपये रोख रक्कम, पाच मोबाईल आणि काही कागदपत्रं जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये या आरशात असलेल्या जादूचे पुरावे देणारे व्हिडिओ होते, असं पोलिसांनी सांगितलं. न्यूज18 नेटवर्कने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Magic Mirror Scam)

अशी झाली फसवणूक

आरोपींनी आपण अँटीक गोष्टी विकणाऱ्या एका सिंगापूरच्या कंपनीतील कर्मचारी असल्याचं भासवलं. एका ओळखीच्या व्यक्तीकडून अविनाश शुक्ला यांना या तिघांबाबत माहिती मिळाली. यानंतर आरोपींनी शुक्ला यांना जादूच्या आरशाच्यी माहिती दिली आणि दोन कोटी रुपयांना हा आरसा आम्ही तुम्हाला विकू असं सांगितलं.

Magic Mirror Scam
Instagram Scam : इन्स्टावर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करण्याची नोकरी; ठाण्यातील बेरोजगार तरुणाला घातला ३७ लाखांचा गंडा!

नासाचे वैज्ञानिक वापरतात आरसा

हा आरसा भविष्य देखील दाखवतो असंही शुक्ला यांना आरोपींनी सांगितलं होतं. सोबतच, अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था 'नासा'चे वैज्ञानिकही याचा वापर करत होते, असंही शुक्ला यांना सांगण्यात आलं.

आरोपींनी शुक्ला यांना हा आरसा कसा काम करतो याचे व्हिडिओही पाठवले होते. हे व्हिडिओ काही विशिष्ट एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करुन तयार करण्यात आले होते. मात्र, अविनाश यांना तेव्हा हे लक्षात आलं नाही.

अविनाश यांनी टप्प्या-टप्प्याने सुमारे नऊ लाख रुपये रक्कम आरोपींना दिली. त्यानंतर बाकी पैसे देण्यासाठी, आणि आरसा पाहण्यासाठी म्हणून ते भुवनेश्वरला गेले. त्याठिकाणी गेल्यावर हे सगळं खोटं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर शुक्ला यांनी पोलिसांत धाव घेतली.

Magic Mirror Scam
Online Gaming : भारतातील पैसा गुपचूप परदेशात पाठवतायत गेमिंग कंपन्या; टॅक्सचोरीसाठी होतोय क्रिप्टोकरन्सीचा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.