Atiq Ahmed : माफिया डॉनला जन्मठेप होताच मायावती अॅक्शन मोडवर; पत्नी शाइस्ताचं तिकीट कापलं

उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal Murder Case) माफिया डॉन अतिक अहमदला (Atiq Ahmed) आणखी एक मोठा झटका बसलाय.
BSP Mayawati
BSP Mayawatiesakal
Updated on
Summary

मायावतींनी शाइस्ता यांना प्रयागराजमधून महापौरपदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. या घोषणेनंतर शाइस्ता यांनीही तयारी सुरू केली होती.

प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal Murder Case) माफिया डॉन अतिक अहमदला (Atiq Ahmed) आणखी एक मोठा झटका बसलाय.

मायावतींच्या (Mayawati) बहुजन समाज पक्षाच्या (BSP) बॅनरखाली 'महापौर' होण्याचं त्याचं स्वप्न भंगलंय. महापौरपदाच्या निवडणुकीत बसपा प्रयागराजमधून आणखी एक उमेदवार उभा करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

BSP Mayawati
Politics : येडियुरप्पांनी काँग्रेसची धाकधूक वाढवली; सिद्धरामय्यांविरुध्द देणार 'हा' तगडा उमेदवार?

यापूर्वी मायावतींनी शाइस्ता यांना प्रयागराजमधून महापौरपदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. या घोषणेनंतर शाइस्ता यांनीही तयारी सुरू केली होती. उत्तर प्रदेशातील प्रसिध्द उमेश पाल हत्या प्रकरणात माफिया डॉन अतिक अहमदसह त्याचा धाकटा भाऊ अशरफ, मुलगा अशद आणि त्याची पत्नी शाइस्ता यांचंही नाव समोर आलंय.

या घटनेपासून फरार असलेल्या शाइस्ताच्या शोधात प्रयागराज पोलीस आणि एसटीएफचं पथक सतत छापेमारी करत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. दरम्यान, गुरुवारी उशिरा निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशमधील नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या.

BSP Mayawati
Karnataka Politics : निवडणुकीआधीच राजकारण तापलं! 'या' नेत्याची आमदारकी धोक्यात; न्यायालयानं ठरवलं 'अपात्र'

यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माफिया अतिकला आधीच ठाऊक होतं की, तो तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. अशा स्थितीत प्रयागराजच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यानं आपला वारसा आधी पत्नीकडं आणि नंतर मुलाकडं हस्तांतरित करण्याची तयारी केली होती.

BSP Mayawati
Politics : 2024 मध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता, आम्ही चौघंही आमदार होणार; BJP आमदाराचं मोठं भाकीत

शाइस्ता यांना महापौरपदाच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णयही याच रणनीतीचा एक भाग होता. यासाठी त्यानं शाइस्ता यांना ओवेसींच्या पक्षातून काढून बसपमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. मात्र, उमेश पाल हत्याकांडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनं ही सारी रणनीती उलटी फिरली आणि शाईस्तालाच फरार व्हावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.