लखनौ - उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद यांनी शनिवारी मऊ येथे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वत:वरच नियंत्रण गमावल्याचं पाहायला मिळालं. निषाद यांनी रागाच्या भरात आपल्या हातातील माईक फेकून दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आलं आहे.
संजय निषाद यांच्या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे कार्यकर्ते आपापसात गप्पागोष्टी करण्यात व्यस्त होते. शिवाय निषाद यांच्या भाषणाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष नव्हते. हे पाहून संजय निषाद संतापले आणि म्हणाले, "अगर हमसे बडा नेता हो तो बोलो नही तो सुनो (माझ्यापेक्षा मोठा नेते कोणी असेल तर बोला, नाहीतर ऐकून घ्या).
मंत्री निषाद एवढ्यावर थांबले नसून त्यांनी रागाच्या भरात मंचावरून माईक फेकून दिला. तसेच तेथे उपस्थित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आता आपापसात गप्पा मारा असं म्हटलं.
पुन्हा माईक घेतल्यानंतर ते कार्यकर्त्यांवर बरसले. म्हणाले, "कितने बडे नेता हो? दुसरे के ईशारे पे चल रहे हो ना...बरबाद हो जाओगे. त्यानंतर निषाद पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडे बोट दाखवत "धीरेंद्र, क्या चाहते हो? बरबादी?, अस म्हणत निषाद यांनी थेट धमकीच दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.