UP विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाजपला बहुमत, समाजवादी पक्षाच्या पदरी निराशा

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर एक महिन्यानंतर भाजपने आणखीन एक इतिहास रचला आहे.
Yogi Adityanath
Yogi Adityanathsakal
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर एक महिन्यानंतर भाजपने आणखीन एक इतिहास रचला आहे. पक्षाने पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेत (UP MLC Election Results) बहुमत मिळविले आहे. भाजपचे आता विधानपरिषदेत १०० पैकी ६० जागा मिळविल्या आहेत. यामुळे योगी सरकारची ताकद आणखीन वाढली आहे. सरकार आता स्वबळावर कायदे विधिमंडळाच्या दोन सभागृहात पारित करु शकते. दुसरीकडे समाजवादी पक्षाचा (Samajwadi Party) झालेल्या दारुण पराभवामुळे विरोधी पक्षांच्या अडचणी वाढू शकतात. अगोदर पासूनच पक्षातील बंडखोरांशी सामना करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढू शकतात. (UP MLC Election Result BJP Got Majority In Legislative Council)

Yogi Adityanath
Aurangabad| अश्लील व्हिडिओ प्रकरणी 'किर्तनकार बाबा'सह महिलेवर गुन्हा दाखल

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेतील रिक्त ३६ जागांपैकी ३३ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. नऊ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध जागा जिंकल्या होत्या. मंगळवारी (ता.१२) २४ जागांवरील विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यासाठी निवडणुकीचा निकाल फारच निराशाजनक ठरला आहे. एकाही जागेवर पक्षाला विजय मिळविता आलेला नाही. दुसरीकडे ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

Yogi Adityanath
राज ठाकरेंचा भोंगा सामान्यांना परवडणारा नाही, छगन भुजबळ यांची टीका

तीन जागांवर भाजपचा पराभव

भारतीय जनता पक्षाचा विधानपरिषद निवडणुकीत ३ जागांवर पराभव झाला. सर्वात मोठा झटका वाराणसीत बसला आहे. येथे पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा सर्वात मोठा झटका मानला जातो कारण वाराणसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. वाराणसीत ब्रजेश सिंह यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह यांचा विजय झाला आहे. आझमगडमध्येही पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. येथे भाजपमधून काढण्यात आलेल्या नेत्याचा मुलगा विक्रांत यांनी विजय मिळविला आहे. या व्यतिरिक्त प्रतापगड जागेवरही भाजपचा पराभव झाला आहे. येथे राजा भैय्या यांच्या पक्षाचे अक्षय प्रताप यांचा विजय झाला आहे.

Yogi Adityanath
सीमेवरील गावात वरिष्ठ आधिकारी करणार मुक्काम; PM मोदी यांची सूचना

कोणत्या जागांवर कोणाचा विजय

इटावा-फररुखाबाद : समाजवादी पक्षाचा गड असलेल्या इटावा-फरुखाबादेत भाजपचे प्रांशू दत्त यांनी विजय मिळविला आहे.

मुर्दाबाद-बिजनौर : या जागेवर भाजपचे सत्यपाल सैनी यांनी विजय मिळविला आहे. सपाचे उमेदवार अजय मलिक यांचा पराभव झाला आहे.

मेरठ-गाझियाबाद - मेरठ-गाझियाबाद जागेवर भाजपचे धर्मेंद्र भारद्वाज यांनी विजय मिळविला आहे.

गोरखपूर -महाराजगंज - भाजपचे उमेदवार सीपी चंद यांनी ४ हजार ४३२ मतांनी विजय मिळविला आहे.

बस्ती-सिद्धार्थनगर - या जागेवर भाजपचे यदुवंश यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी सपाचे सन्नी यादव यांचा ४ हजार २८० मतांनी पराभव केला.

देवरिया-कुशीनगर - भाजपचे रतनपाल सिंह यांनी सपा उमेदवार डाॅ.कफील खान यांना ३ हजार २५१ मतांनी हरवले.

बहरीच-श्रावस्ती - बहरीच-श्रावस्ती जागेवर भाजप उमेदवार डाॅ. प्रज्ञा त्रिपाठी यांनी विजय मिळविला आहे.

यांचा बिनविरोध विजय

लखीमपूर खिरीतून अनुप कुमार गुप्ता, बांदा-हमीरपूरमधून जितेंद्र सेंगर, एटा-मैनपुरी-मथुरातून आशिष यादव, ओमप्रकाश सिंह, बुलंदशहरमधून नरेंद्र भाटी, अलिगडमधून ऋषीपाल, हरदोईमधूनअ अशोक अग्रवाल, मिर्झापूर-सोनभद्रमधून श्याम नारायण सिंह आणि बदायूमधून वागीश पाठक आदींनी बिनविरोध मिळविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.