उत्तर प्रदेश एसटीएफने केलेल्या कारवाईवेळी मुख्तार अन्सारी गँगमधील दोन शार्पशूटर चकमकीत ठार झाले आहेत.
उत्तर प्रदेश एसटीएफने केलेल्या कारवाईवेळी मुख्तार अन्सारी गँगमधील दोन शार्पशूटर चकमकीत ठार झाले आहेत. अलीशेर उर्फ डॉक्टरसह त्याचा सहकारी कामरान उर्फ बन्नू यांची आणि एसटीएफची लखनऊतील फैजुल्लागंज इथं बंधा रोडवर चकमक झाली. यात दोघेही ठार झाले आहेत. अलीशेरने २२ सप्टेंबरला झारखंडच्या भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जीतराम मुंडा यांची हत्या केली होती. त्या दोघांवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तसंच दोघेही आजमगढचे बसपा नेते कलामुद्दीन हत्येतही सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
एसटीएफचे अतिरिक्त संचालक अमिताभ यश यांनी सांगितलं की, जीतराम मुंडा यांच्या हत्येनंतर अलीशेर हा फरार होता. अलीशेर हा मूळचा आजमगढमधील देवगावचा तर कामरान हा गंभीरपूरचा आहे. अलीशेरचे लोकेशन मडियांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फैजुल्लागंज इथं मिळालं होतं. त्यानंतर एसटीएफ तिथे पोहोचली होती.
एसटीएफने दोघांना चहुबाजूंनी घेरल्यानंतर दोघांनीही गोळीबार सुरु केला. याला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. यात अलीशेर आणि कामरान यांनी गोळ्या लागल्या. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. दोघांजवळ कार्बाईन, दोन पिस्तूल आणि काडतूस सापडले आहेत.
एएसपी विशाल विक्रम सिंह यांनी सांगितले की, आजमगढमध्ये बसपा नेते कलामुद्दीनच्या हत्येत अलीशेर सहभागी होती. त्यावेळी हत्या केल्यानंतर अलीशेर दुबईला गेला होता. दुबईच्या एका बिझनेसमनच्या सांगण्यावरून सुपारी घेत ही हत्या करण्यात आली होती. अशाच पद्धतीने भाजप नेता जीतराम यांचीही हत्या पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.