Lakhimpur Tikunia Case : मुख्य साक्षीदाराच्या धाकट्या भावावरच तलवारीनं प्राणघातक हल्ला; मंत्र्याच्या मुलावर आरोप

याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप प्रभूजोतनं केलाय.
Uttar Pradesh Lakhimpur Kheri Case
Uttar Pradesh Lakhimpur Kheri Caseesakal
Updated on
Summary

याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप प्रभूजोतनं केलाय.

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी (Uttar Pradesh Lakhimpur Kheri) येथील टिकुनिया घटनेचा मुख्य साक्षीदार प्रभूजोत सिंगचा धाकटा भाऊ सर्वजीत सिंग याच्यावर मुंडन समारंभात प्राणघातक हल्ला झाला आहे.

टिकुनिया प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभूजोतनं आरोप केलाय की, टिकुनिया प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्या सांगण्यावरून माझ्या भावावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरीच्या टिकुनिया कोतवाली क्षेत्राशी संबंधित आहे. जिथं टिकुनिया घटनेचा साक्षीदार प्रभूजोत सिंग 9 डिसेंबरला आपल्या धाकट्या भावासोबत मुंडन समारंभासाठी गेला होता. तिथं उपस्थित असलेल्या विकास चावलानं त्याच्या भावावर तलवारीनं प्राणघातक हल्ला. यामध्ये त्याचा भाऊ सर्वजीत सिंग गंभीर जखमी झाला असून सर्वजीतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Uttar Pradesh Lakhimpur Kheri Case
प्रवाशांनो, सावधान! Air India च्या विमानात आढळलाय साप; DGCA चे तात्काळ चौकशीचे आदेश

टिकुनिया घटनेचा साक्षीदार प्रभूजोत सिंग म्हणाला, या खटल्याची सुनावणी 16 तारखेपासून सुरू होणार आहे. यामुळंच लहान भावावर दबाव टाकण्यासाठी हल्ला करण्यात आला. याआधीही त्याच्यावर हल्ला झाला होता. आता माझ्या धाकट्या भावावर टिकुनिया प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचा माजी लेखापाल विकास चावलानं त्याच्या साथीदारासह तलवारीनं हल्ला केला. यात माझा लहान भाऊ गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप प्रभूजोतनं केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()