Crime News: प्रियकराने लग्न केले म्हणून तरुणीने चिरला नववधूचा गळा, काय आहे थरकाप उडवणारे प्रकरण?

Crime News In Marathi: उत्तर प्रदेशातील वाराणसीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक तरुण आणि तरुणीचे प्रेम प्रकरण सुरू होते. दोघांचेही कुटुंब या नात्यावर नाराज होते.
UP Varanasi Crime News
UP Varanasi Crime NewsEsakal
Updated on

उत्तर प्रदेशातील वाराणसीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक तरुण आणि तरुणीचे प्रेम प्रकरण सुरू होते. दोघांचेही कुटुंब या नात्यावर नाराज होते. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिले. पण नवविवाहित वधूला पुढे काय होणार आहे हे माहीत नव्हते. कारण दोन महिन्यांनंतर, नववधू तिच्या बेडरूममध्ये झोपली असताना, तिच्या पतीची प्रेयसी आली आणि तिला धमकावत वस्तराने तिचा गळा कापला.

रक्तबंबाळ झालेल्या नववधूचा आरडाओरडा ऐकूण बाकीचे कुटुंबही आपापल्या खोलीतून बाहेर आले. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कबीरचौरा विभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

सध्या वधूची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी महिलेचा पती आणि तिच्या प्रेयसीला अटक केली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

हे प्रकरण वाराणसीच्या चोलापूर भागातील आहे. गडसरा गावातील बबलू अन्सारी याचे गावातील एका तरुणीशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी होती.

काही महिन्यांपूर्वी, मुलीचे कुटुंबीय तिचा आणि प्रियकराचा संवाद थांबवण्यासाठी तिला नातेवाईकाच्या घरी घेऊन गेले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी बबलू अन्सारीच्या कुटुंबीयांनी त्याचा विवाह आझमगडमधील माहुली येथील रोशन जहाँशी केला.

UP Varanasi Crime News
Uttrakhand: उत्तराखंड राज्यआंदोलकांना धामी सरकारने दिले सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण

दुसरीकडे, प्रियकराचे लग्न झाल्यानंतर मुलीचे कुटुंबीय तिच्यासह गावी परतले. बबलू अन्सारीची पत्नी नुकतीच सासरी आली होती. ती घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपली होती. त्यानंतर बबलूची मैत्रीण वस्तरा घेऊन खोलीत घुसली आणि रोशन जहाँ झोपेत असताना तिच्या मानेवर वार केले. त्यामुळे तिला रक्तस्त्राव झाला. पीडितेने आरडाओरड केला असता कुटुंबीयांनी तेथे धाव घेत हल्लेखोर मुलीला पकडले.

UP Varanasi Crime News
Terrorists Arrests: 'अल कायदा' विरोधात पोलिसांची मोठी कारवाई; देशातून 14 जणांना केली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.