बापरे! गाणं ऐकण्यासाठी पत्नीला मोबाईल मागणं पडलं महागात; डोळ्यात थेट कात्रीच खुपसली

गाणे ऐकण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या पतीच्या डोळ्यात पत्नीने कात्री खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 up woman stabbed her husband in the eye
up woman stabbed her husband in the eye
Updated on

लखनऊ- गाणे ऐकण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या पतीच्या डोळ्यात पत्नीने कात्री खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पतीच्या माहितीवरुन तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

पोलिसांनी माहिती दिली की, अनकितने याप्रकरणी आपली पत्नी प्रियांका हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु केला आहे. (up woman stabbed her husband in the eye with a pair of scissors when asked mobile phone to listen to songs on a social media platform)

 up woman stabbed her husband in the eye
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविल्याने वकिलावर गुन्हा

पोलिसांनी सांगितलं की, अनकितने प्रियांकाला यूट्यूबवर गाणे ऐकण्यासाठी मोबाईल फोन मागितला. पण, प्रियांकाने मोबाईल देण्यास नकार दिला. मला स्वत:ला गाणे ऐकायची आहेत, असं म्हणत तिने मोबाईल अनिकेतला दिला नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रियांकाने कथितरित्या अनकितच्या डोळ्यामध्ये कात्री खुपसली.

 up woman stabbed her husband in the eye
Pune News : लाच घेतल्याप्रकरणी ससूनमधील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

अनकितला त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सदर प्रकार लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()