Upendra Kushwaha Quits JDU : उपेंद्र कुशवाहांचा JDU ला गुडबाय; केली नव्या पक्षाची घोषणा

'राष्ट्रीय लोक जनता दल' असे कुशवाह यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल.
Upendra Kushwaha
Upendra KushwahaSakal
Updated on

Upendra Kushwaha Quits JDU : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत अनेक दिवसांच्या मतभेदानंतर उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूला गुडबाय केलं आहे.

हेही वाचा : स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

यावेळी कुशवाह यांनी JDU सोडण्याची घोषणा करत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 'राष्ट्रीय लोक जनता दल' असे कुशवाह यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल.

बैठकीला आलेल्या अनेक जेडीयू कार्यकर्त्यांनी मला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वेगळा पक्ष स्थापन करण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

Upendra Kushwaha
Bharat Gogawale : राऊत तुम्ही बोलत राहा; तुमच्या बोलण्यानेच...; गोगावलेंचं सूचक वक्तव्य

उपेंद्र कुशवाह म्हणाले की, आजपासून मी नवी राजकीय खेळी सुरू करत असल्याचे सांगत त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना. यावेळी त्यांनी आरजेडीसोबत युती करण्यावरही आक्षेप घेतला.

ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी आम्ही जेडीयूमध्ये आलो तेव्हा राज्यासमोरील परिस्थिती वेगळी होती. त्याआधी जनतेने जननायकाचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी लालू यादव यांच्यावर सोपवली होती. 

Upendra Kushwaha
Sanjay Raut : संजय राऊत गरजले; शहाचं राज्याचे अन् मराठी माणसांचे...

सुरुवातीच्या टप्प्यात लालूंनी जनतेचे हित हाती घेतले, पण नंतर ते भरकटले.  त्यानंतर नितीश कुमार यांनी सुरुवातीच्या टप्प्यात खूप चांगले काम केले. पण शेवट वाईट झाला. विरोधी पक्षांमध्ये एकजूट नसल्याचे सांगत अशा परिस्थितीत 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना विजय मिळवणे सोपे जाईल असे कुशवाह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.