BJP-JDU : भाजपसोबत युती करूच याची शाश्वती नाही, जदयू नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

सध्या मोदी सरकार आणि मित्र पक्षांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.
Upendra Kushwaha Nitish Kumar
Upendra Kushwaha Nitish Kumaresakal
Updated on
Summary

सध्या मोदी सरकार आणि मित्र पक्षांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.

सध्या मोदी सरकार (Modi Government) आणि मित्र पक्षांमध्ये नाराजी पहायला मिळत असून अनेक मित्र पक्षांनी मोदी सरकारला सोडचिठ्ठी दिलीय. त्यात आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील नाराज असल्याचं कळतंय. बिहारमध्ये भाजप (BJP) व जदयूच्या युतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हजर राहिले नव्हते. त्यावरून आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

मात्र, असं असतानाच जदयूचे संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी एक वक्तव्य केलं असून त्यामुळं बिहारच्या राजकारणात खळबळ उडालीय. 'जदयू 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) व 2025 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करेलच याची काही शाश्वती नाही’ असे संकेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यात खळबळ उडाली आहे. या विधानानंतर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.

Upendra Kushwaha Nitish Kumar
MP : भाजपनं मुस्लिम उमेदवारांवर दाखवला विश्वास, 25 प्रभागांत हिंदू उमेदवारांचा केला पराभव

‘आपण भविष्याबाबत काहीही सांगू शकत नाही. भविष्याची शाश्वती कोण देईल. सध्या आम्ही एकत्र आहोत. पण, 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर काय होईल याचं आताच कसं सांगणार? आपण फक्त सद्यस्थितीबाबत बोलू शकतो’, असं कुशवाह प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. बिहारमध्ये 2020 साली पहिल्यांदा भाजपला जदयूपेक्षा जास्त जागा जिंकता आल्या होत्या. या निवडणुकीत भाजप 74 जागांवर विजयी झाली होती, तर जदयूच्या 43 जागांवर जिंकली होती. तर, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं सर्वाधिक 75 जागा जिंकल्या होत्या. मात्र, बिहारमध्ये भाजप-जदयूच्या युतीचं सरकार स्थापन झालं. परंतु, आता त्यांच्यातील धुसफूस बाहेर पडताना दिसत आहे.

Upendra Kushwaha Nitish Kumar
एवढा मोठा त्याग करूनही पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही : क्षीरसागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.