UPI-PayNow : भारत-सिंगापूरमध्ये क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटीला सुरूवात; सामान्यांना होणार फायदा

या कारारामुळे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सहजतेने UPI द्वारे भारतात पैसे हस्तांतरित करता येणार आहेत.
UPI-PayNow integration launched
UPI-PayNow integration launchedSakal
Updated on

UPI-PayNow : भारत आणि सिंगापूरमध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या करारातंर्गत भारतातील UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि सिंगापूरचे PayNow यांना जोडून दोन्ही देशांदरम्यान क्रॉस-बॉर्डर पेमेंट कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे.

UPI-PayNow integration launched
MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांना फडणवीसांकडून पुन्हा आश्वासन; म्हणाले, तर कोर्टात जावं लागेल...

सुरू करण्यात आलेल्या या करारावर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी स्वाक्षरी केली.

यासेवेमुळे दोन्ही देशातील नागरिकामध्ये पैशांची देवाणघेवाण तसेच काही सेकंदात पैसे हस्तांतरीत करणे सोपे होणार आहे.

UPI आणि PayNow चा वापर करून, सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय UPI द्वारे भारतात पैसे ट्रान्सफर करू शकतील.

UPI-PayNow integration launched
Viral Video : चक्क Chat GPT ने एअरलाइन्सलाच खडसावलं! व्हिडीओ होतोय व्हायरल

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • दोन्ही देशातील या करारानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस दोन्ही देशांसाठी खूप आनंदाचा असून, या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत.

  • या कारारामुळे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सहजतेने UPI द्वारे भारतात पैसे हस्तांतरित करता येणार आहेत.

  • आजचा करार म्हणजे डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मोदी म्हणाले. याचा विशेष फायदा विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

  • 2022 मध्ये UPI च्या माध्यमातून 126 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त रकमेचे 74 अब्ज व्यवहार झाल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. UPI द्वारे मोठ्या संख्येने होणारे व्यवहार स्वदेशी डिझाइन केलेली पेमेंट प्रणाली अतिशय सुरक्षित असल्याचे दाखवून देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.