मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 'लोकसेवा परीक्षा २०२०' चा निकाल (exam result announced) आज सायंकाळी जाहीर झाला आहे. यात देशभरातून एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत बिहारचा शुभम कुमार (shubham kumar) परीक्षेत पहिला आला आहे. जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिनं भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे.तर महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून विनायक नरवडे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे. . २४ वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. २०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
आयोगाने ८३६ जागांसाठी झोतलेल्या या परीक्षेतून ७६१ पात्र उमेदवार मिळाले आहेत. याचबरोबर १५० जणांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. आयोगाने दिलेल्या जागांमध्ये १८० आयएएस, ३६ भातीय परदेश सेवा, २०० आयपीएस, ३०२ गट ‘अ’, ११८ गट ‘ब’ सेवांची पदे आहेत. यंदा या परीक्षेला सुमारे १० लाख ४० हजार ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १० हजार ५६४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यातून दोन हजार ५३ विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम ७६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली. यंदाच्या निकालात मुलींची संख्या वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अंतिम यादीत ५४५ पुरुष तर २१६ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
बार्टीचे 9 विद्यार्थी यूपीएससीत यशस्वी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.