UPSC Result: घरीच अभ्यास करुन मिळवली देशात दुसरी रँक; गरिमा लोहिया हीनं सांगितलं यशाचं गमक

संघ लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये टॉप चारमध्ये सर्व मुलीचं आहेत.
Garima Lohiya
Garima Lohiya
Updated on

UPSC Result: संघ लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशात दुसरी रँक मिळवणारी गरिमा लोहिया हीनं कुठलाही क्लास न लावता घरीच अभ्यास करुन नेत्रदिपक यश मिळवलं आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना तीनं आपल्या यशाचं गमक सांगितलं आहे. (UPSC Result All India 2nd rank Garima Lohiya told the secret of success with studying at home)

गरिमा म्हणाली, "मी बक्सर सारख्या छोट्या शहरात शिकले आणि आत्ता हे यश मिळालं आहे तर यासाठी मी खूपच नशिबवान आहे. माझ्या शाळेतच मला खूपच चांगलं शिक्षण मिळालं त्याच्याशिवाय मी पुढचं पाऊल टाकूच शकले नसते, कारण जर माझा पायाचं इतका पक्का नसता तर हे शक्य झालं नसतं" (Latest Marathi News)

Garima Lohiya
UPSC Result: ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली; यशामागे किरण बेदींचा राहिला प्रभाव

घरुनच अभ्यास करुन मिळवता येतं यश

त्यामुळं जर तुमच्या छोट्या शहरामध्येच जर तुम्हाला चांगली संधी मिळत असेल तर तुम्ही तिथचं शिकलं पाहिजे. घरीच अभ्यास केल्याचा देखील मोठा फायदा असतो. तुमचा कमी वेळ वाया जातो तसेच तुम्हाला सातत्यानं मोटिवेशन मिळत राहतं. त्यामुळं आपलं आपणचं निश्चित करायचं की, तुम्हाला बाहेर राहुन परीक्षेची तयारी करण्यात जास्त सोयिस्कर वाटतं की घरीच राहुन अभ्यास करण्यात. (UPSC Exam 2022 Result)

Garima Lohiya
UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली

कोणती वेळ अभ्यासाठी योग्य?

तुम्हाला दिवसभरात ज्या वेळेत जास्त डिस्टर्ब करणारी वेळ वाटते ती वेळ टाळून तुम्ही अभ्यासाला प्राधान्य दिलं पाहिजे. जसं की मी घरुनच अभ्यास केला तेव्हा मला वाटायचं की दिवसभर सारखा गोंधळ असतो तर मी रात्री ९ ते सकाळी ९ या वेळात अभ्यास करायचे. कारण या काळात खूपच शांतता असायची, यावेळीत तुम्हाला कोणी फोन करत नाही किंवा कोणी मेसेज करणार नाही. यामध्ये कोणताही डिस्टर्बन्स राहणार नाही.

जर तुम्ही १६ तास अभ्यास करुनही दोनच तासांचा अभ्यास करत असाल किंवा दोनच तासांत १६ तासांचा अभ्यासही करु शकता. त्यामुळं तुमच्या अभ्यासाचं आऊटपुट किती आहे ते चेक करावं तसेच कमीत कमी तासांमध्ये जितका जास्त अभ्यास करायचा तो करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.