UPSC म्हणजे केंद्रीय प्रचार संघ आयोग : राहुल गांधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर ताशेरे ओढले
UPSC stands for Central Publicity Commission Rahul Gandhi delhi
UPSC stands for Central Publicity Commission Rahul Gandhi delhiesakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष म्हणून मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर ताशेरे ओढले आहेत. या आयोगाला आता ‘केंद्रीय प्रचार संघ आयोग’ असे म्हटले पाहिजे, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी ट्विटमध्ये सोनी यांच्याविषयी एका न्यूज पोर्टलवर दिलेल्या बातमीचा संदर्भ देत या नियुक्तीबद्दल आक्षेप घेतला. यासोबतच घटना मोडीत काढली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. काही जणांनी त्यांचेच समर्थन करताना भाजपवर टीका केली आहे, तर काही जणांनी कॉंग्रेसवर तोंडसुख घेतले आहे. सोनी यांची संघ आणि भाजपशी जवळीक असल्याचा दावा ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने केला आहे. त्याचाच दाखला देत गांधी यांनी या नियुक्तीवर टीका केली. आयोगाचे अध्यक्ष होण्यापूर्वी ते बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसेच नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची भाषणे लिहिणारांपैकी ते एक होते, असेही यात म्हटले आहे.

मनोज सोनी कोण आहेत?

मनोज सोनी यांचा परिचय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला. त्यानुसार ते राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांतील तज्ज्ञ आहेत. सरदार पटेल विद्यापीठात त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर अध्यापनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.