CJI DY Chandrachud: "किड्यांसारखे जीवन जगण्यास मजबूर..."; UPSC विद्यार्थ्याने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

UPSC student letter to CJI : शनिवारी ओल्ड राजेंद्र नगर येथील Rau's IAS स्टडी सर्कल इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांची ओळख उत्तर प्रदेशच्या श्रेया यादव, तेलंगणाच्या तान्या सोनी, आणि केरळच्या नेविन डाल्विन अशी झाली.
CJI DY Chandrachud news
CJI DY Chandrachud newsesakal
Updated on

दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील Rau's IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात यूपीएससीच्या एका विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. अविनाश दुबे या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "ओल्ड राजेंद्र नगर आणि मुखर्जी नगर सारख्या भागात विद्यार्थ्यांचे जीवन नरकासारखे झाले आहे. मी आपल्याला विनंती करतो की तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या लोकांविरूद्ध कठोर कारवाई केली जावी आणि आमचे संवैधानिक अधिकार जपले जावेत,"

जलभरावाच्या समस्येचे निराकरण करा-

विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयाला आवाहन केले आहे की, ओल्ड राजेंद्र नगर आणि मुखर्जी नगर सारख्या भागात जलभरावाची समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जावेत. या भागात विद्यार्थ्यांना नाल्या तुंबल्यामुळे घाणीत जगावे लागत आहे. पावसाचे पाणी घरात येते, आणि आम्हाला गुडघ्यापर्यंत  पाण्यात चालावे लागते. दिल्ली सरकार आणि एमसीडी यांच्यामुळे आमचे जीवन किड्यांसारखे झाले आहे.

रविवारी झालेल्या दुर्घटनेची माहिती-

शनिवारी ओल्ड राजेंद्र नगर येथील Rau's IAS स्टडी सर्कल इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांची ओळख उत्तर प्रदेशच्या श्रेया यादव, तेलंगणाच्या तान्या सोनी, आणि केरळच्या नेविन डाल्विन अशी झाली.

CJI DY Chandrachud news
New Sebi Rules: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आता 1 एप्रिल 2024 पासून सेबीचे नवे नियम होणार लागू

दुर्घटना कशी घडली?

अधिकृत विधान अद्याप आलेले नाही, परंतु प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की शनिवारी जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. ड्रेनेज सिस्टम नसल्यामुळे तेच पाणी कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये शिरले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल-

या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात विद्यार्थी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एका व्हिडिओत पावसामुळे कोचिंग सेंटरचा मुख्य प्रवेशद्वार कोसळताना दिसत आहे, ज्यामुळे बेसमेंटमध्ये पाणी भरले. काही विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की बायोमेट्रिक सिस्टम बिघडल्यामुळे विद्यार्थी बेसमेंटमध्ये अडकले होते.

CJI DY Chandrachud news
Uran Murder Case: यशश्री शिंदे प्रकरणात मोठी अपडेट, एकजण ताब्यात; दाऊद नाही तर मोहसीनने...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.