अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने वसवलं गाव, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये उल्लेख

चीनने २०२० या वर्षात नागरी वस्तीसाठी १०० घरे बांधली आहेत.
India and China
India and ChinaSakal
Updated on

नवी दिल्ली: अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (US Defence Report) चीनचा (China) सहभाग असलेल्या लष्करी घडामोडींसंबंधी वार्षिक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल अमेरिकन काँग्रेसकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालात भारत-चीन नियंत्रण रेषेवरील (India-China Lac) तणावाबाबत भाष्य करण्यात आलं आहे, तसंच चीनने भारताच्या हद्दीत अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal pradesh) एक गाव वसवल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. लोकांना राहण्यासाठी चीनने १०० घर बांधली आहेत. मॅकमोहन लाइनच्या दक्षिणेला भारताच्या हद्दीत हे चिनी गाव असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात एनडीटीव्हीने हाय रेसोल्युशनच्या उपग्रह छायाचित्राद्वारे सर्वप्रथम ही बाब समोर आणली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या नियंत्रणाखाली असलेला तिबेट स्वायत्ता प्रदेशातील वादग्रस्त भागामध्ये चीनने २०२० या वर्षात नागरी वस्तीसाठी १०० घरे बांधली असे अमेरिकन संरक्षण विभागाच्या भारत-चीन सीमावादाच्या चॅप्टरमध्ये म्हटले आहे.

India and China
आर्यन खान आज NCB समोर होणार हजर

हे गावं तसंच अन्य पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती हा भारत सरकार आणि तिथल्या प्रसारमाध्यमांसाठी काळजीचा विषय असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे वादग्रस्त गाव त्सारी चू नदीच्या किनाऱ्यावर आणि अरुणाचल प्रदेशच्या वरच्या भागात असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यामध्ये येते.

India and China
बहिणीने बाथरूममध्ये डोकावून बघितले; दृष्य पाहताच धावत गेली

१९६२ च्या युद्धाआधी सुद्धा भारत-चीनच्या सैन्यामध्ये इथे चकमक झाली होती. दशकभरापेक्षा जास्त काळ चीनने या भागात एक चौकी ठेवली होती. पण २०२० मध्ये परिस्थितीमध्ये अचानक मोठा बदल झाला. चीनने इथे एक गाव वसवलं आणि भारताच्या हद्दीतच रस्त्याचं बांधकाम केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()