कमला हॅरिस यांचा थेट मोदींना फोन; लस पुरवठ्यावर झाली चर्चा

लस उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून यामध्ये देशांतर्गत लसींचे उत्पादन वाढविणे आणि परदेशातून पुरवठा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.
USA-IND
USA-INDFile photo
Updated on
Summary

लस उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून यामध्ये देशांतर्गत लसींचे उत्पादन वाढविणे आणि परदेशातून पुरवठा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारत-अमेरिका (India-USA) या दोन देशांमधील भागीदारी आणि कोरोना लसींसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या संभाषणासाठी कमला हॅरिस यांनी विनंती केली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएनआय वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, हा फोन कॉल कमला हॅरिस यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना करण्यात आला होता. (US Vice President Kamala Harris spoke with PM Narendra Modi in a direct call)

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत कमला हॅरिस यांच्याशी झालेल्या संवादाबाबतची माहिती दिली. “जगभरात लसींचे वाटप करण्याच्या अमेरिकेच्या रणनीतीचा एक भाग म्हणून भारताला लस पुरवठा करण्यात येत आहे, याचे मी मनापासून कौतुक करतो. भारत-अमेरिका दोन्ही देशांच्या सहकार्यातून लसींचे उत्पादन घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही यावेळी चर्चा केली,” असे पंतप्रधान म्हणाले. जगभरात ओढावलेले कोरोना संकट संपल्यानंतर आणि जागतिक आरोग्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर हॅरिस यांचे भारतात स्वागत करण्याची इच्छाही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली.

USA-IND
गौतम गंभीर फाउंडेशन दोषी; ड्रग कंट्रोलरची हायकोर्टला माहिती

अमेरिका भारतासह या देशांना लस देईल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले की, अमेरिका भारतासह आशियातील अनेक देशांना ८ कोटी कोरोना लस देणार आहे. भारताव्यतिरिक्त आशिया खंडातील नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव, मलेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, लाओस, पापुआ न्यू गिनी आणि तैवान या देशांना लस देणार आहे. तसेच लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांकरिता सुमारे ६० लाख लस, दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियासाठी सुमारे ७० लाख आणि आफ्रिकेसाठी ५० लाख लस देण्यात येणार आहेत. ६० लाखाहून अधिक लसी या संकटात असलेल्या इतर देशांना देण्यात येणार आहेत. कॅनडा, मेक्सिको, भारत आणि कोरिया या देशांना प्रामुख्याने लस दिली जाणार आहे.

USA-IND
विधानसभा निवडणुकांमध्ये EVM, VVPATची मोजणी १०० टक्के जुळली - EC

लस आणि कच्च्या मालासाठी यूएस-भारतामध्ये चर्चा

कोरोना लसींच्या खरेदी संदर्भात अमेरिकन लस उत्पादकांशी संपर्क साधण्यात येत आहे. लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि इतर घटकांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाशीही संवाद साधला जात आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.

या कंपन्यांच्या संपर्कात भारत

बागची पुढे म्हणाले की, लस उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून यामध्ये देशांतर्गत लसींचे उत्पादन वाढविणे आणि परदेशातून पुरवठा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. आम्ही मॉडर्ना, फायझरसारख्या अमेरिकन लस उत्पादकांशी संपर्क साधत आहोत. भारतात लस उत्पादनासाठी कच्चा माल आणि इतर घटकांचा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही अमेरिकन प्रशासनाच्या संपर्कात आहोत.

नुकताच अमेरिका दौर्‍यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचे बागची यांनी सांगितले. ते म्हणाले की, जलद लसीकरणाद्वारे कोरोना महामारीला रोखणे सर्वांच्या हिताचे आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.