UP: २५ गायींचा मृत्यू, योगी आदित्यनाथांची संतप्त प्रतिक्रिया; 'आरोपीला...'

गायींना दिलेला चारा ताहिर नावाच्या एका व्यक्तीकडून खरेदी करण्यात आला होता.
Chief Minister Yogi Adityanath
Chief Minister Yogi Adityanathsakal
Updated on

उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधल्या एका गोशाळेत २५ गायींचा मृत्यू झालाय. तर अनेक गायी गंभीर आजारी पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही संतप्त झाले आहेत.

Chief Minister Yogi Adityanath
पांचजन्य अमृतमहोत्सव; उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था; योगी आदित्यनाथ

अमरोहा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, विषारी चारा खाल्ल्याने या गायींचा मृत्यू झाला आहे. हा चारा ताहिर नावाच्या एका व्यक्तीकडून खरेदी करण्यात आला होता. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

Chief Minister Yogi Adityanath
UP : शाळकरी विद्यार्थ्यांनी टोळ्या तयार करत ३ महिने घडवले बॉम्बस्फोट; ११ जणांना अटक

या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसंच ज्या गायी आजारी पडल्या आहेत, त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले आहेत. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीची सुटका होणार नाहीच, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

विषारी चारा खाल्ल्याने काही गायींची प्रकृती गंभीर आहे. कपटाने चाऱ्यामध्ये विषारी पदार्थ मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांथलपूरमधल्या गोशाळेतली ही घटना आहे. या गोशाळेत एकूण १८८ पशू नोंदणीकृत आहेत. या गोशाळेत काम करणाऱ्याने चारा विक्रेता ताहिरकडून चारा खरेदी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.