आणखी आठ आमदार पक्षात; अखिलेश यादव म्हणतात, 'या भाजपच्या हिट विकेट्स'

Akhilesh Yadav
Akhilesh Yadavsakal media
Updated on

लखनऊ: उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. पाचही राज्यांतील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. बहुमतानं सत्तेवर आलेल्या भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक आमदार आणि मंत्री पक्षाला रामराम ठोकत असून पक्षाला अभूतपूर्व अशी गळती लागलेली आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पार्टीने सत्ताधारी भाजपवर तुफान टीकास्त्र सोडायला सुरुवात केली असून विजयासाठी प्रयत्न चालवले आहेत. वेगवगेळ्या पक्षातून असे मिळून आणखी आठ आमदार समाजवादी पक्षात आज सामील झाले आहेत. यामध्ये बहुजन समाज पक्षाचेही आमदार सामील आहेत.

Akhilesh Yadav
दिल्लीत बॉम्ब तर पंजाबमध्ये RDX सापडल्यानं खळबळ

आज समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एका सभेतील भाषणात म्हटलंय की, डिजीटल इंडियामधील गडबड कोण विसरु शकतंय? छापा मारायचा होता दुसरीकडेच आणि छापा आपल्या इथेच मारला. म्हणूनच आता निवडणुका आलेल्या आहेत आणि आम्ही याचीच वाट पाहत होतो. आता सायकलचे हँडल पण ठिक आहे आणि सायकलचे पॅडलही ठिक आहे. आणि पॅडल चालवणारे किती तरुण समोर दिसत आहेत. आता सायकल एकदम मजबूत आहे आणि तिच्या वेगाला कुणीच रोखू शकत नाही. जेंव्हा समाजवादी आणि आंबेडकरवादी सोबत आलेले आहेत, तर कुणीच रोखू शकत नाही.

Akhilesh Yadav
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २ टप्प्यात; ३१ जानेवारीपासून सुरुवात

कार्यकर्त्यांना संबोधित करताना अखिलेश यादव म्हणालेत की, यावेळी भाजपची हिट विकेट पडली आहे. त्याच्या विकेट्स सातत्याने पडत आहेत. बाबांचा झेल सुटला आहे. आमच्या नेत्यांची रणनीती त्यांना समजली नाही. मौर्यजी संपूर्ण टीमसोबत येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. ते पुढे म्हणाले की, लोक म्हणत आहेत की ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे, पण ही अंतिम निवडणूक आहे. यावेळी व्हर्च्युअल रॅली होणार आहे. आम्ही समाजवादी व्हर्च्युअल, डिजिटल आणि प्रत्यक्षआतही चालणार आहोत. सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत गावोगावी जाणार आहोत.

दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये अमृतलाल भारती या दलित व्यक्तीच्या घरी जेवण केल्याचं सांगितलंय. त्यांनी म्हटलंय की, शेड्यूल कास्ट जातीमधून येणाऱ्या अमृतलाल भारती यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला मकर संक्रांतीनिमित्त 'खिचडी सहभोज'साठी आमंत्रण दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()