म्हैस, घोडीच्या शोधानंतर यूपी पोलिसांवर आमदाराचं 'मांजर' पकडण्याची जबाबदारी

Cats
Catsesakal
Updated on
Summary

दोन दिवस प्रकाशझोतात राहिलेल्या शहीद अशफाक उल्ला खान प्राणी उद्यानातील रेंजरसह सहा कर्मचाऱ्यांना आमदारांच्या घरातून सहा पाळीव मांजरांची सुटका करण्यात यश आलंय.

आझम खान (Azam Khan) यांची म्हैस आणि रामपुरातील काँग्रेस नेते हाजी नाजिश खान (Congress leader Haji Nazish Khan) यांची घोडी पकडण्यासाठी चर्चेत असलेल्या यूपी पोलिसांना (UP Police) प्राणी संग्रहालयातील सहा कर्मचाऱ्यांनी आव्हान दिलंय. मात्र, यावेळी मंत्र्यांची म्हैस पकडायची नसून आमदाराची 'मांजर' पकडायची होती. दरम्यान, दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सहा पाळीव मांजरांना जेरबंद करण्यात प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना यश आलंय.

दोन दिवस प्रकाशझोतात राहिलेल्या शहीद अशफाक उल्ला खान प्राणी उद्यानातील रेंजरसह सहा कर्मचाऱ्यांना आमदारांच्या घरातून सहा पाळीव मांजरांची सुटका करण्यात यश आलंय. या मांजरी आमदारांसाठी डोकेदुखी ठरल्या होत्या. त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी गोरखपूर प्राणी उद्यानाची मदत घेतली.

Cats
'हा' आहे जगातला सर्वात महागडा मासा; किंमत करोडोंत

शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमएलसीच्या घरी एका मांजरीनं चार पिल्लांना जन्माला दिलाय. त्यामुळं या मांजरांच्या आवाजानं संपूर्ण घर त्रस्त झालंय. सर्व प्रयत्नांनंतरही कुटुंबाची मांजर आणि तिच्या पिलांपासून सुटका होऊ शकली नाही. त्यानंतर प्राणी उद्यानाचे रेंजर सुनील राव यांची मदत घेण्यात आली. शनिवारपासून माळी गौरव, संदीप, विनय, जगदंबा, चंद्रदेव हे रेंजर सुनील राव यांच्या नेतृत्वाखाली मांजरांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना अपयश येत होतं. अखेर सोमवारी कर्मचाऱ्यांनी मांजर आणि तिच्या बाळाची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. सोमवारी मांजर पकडण्यासाठी जाळ्याचा वापर करण्यात आला. मात्र, जाळ्यातून बाहेर पडलेल्या मांजरीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना मांजराच्या नख्याने विनय जखमी झाले. त्यांना तत्काळ डॉक्टरांनी अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिलाय.

Cats
खुशखबर! यूपी सरकार देणार 22 हजारांहून अधिक सरकारी नोकऱ्या

वन्यप्राण्यांना वाचवण्याचं काम प्राणी उद्यानाचं नाही, तर वनविभागाचं आहे. इतर पाळीव मांजरी वन्यजीवांच्या श्रेणीत येत नाहीत, त्यामुळं त्यांच्या बचावाचा प्रश्नच उद्भवत नाही. सध्या माझ्या सूचनेनुसार प्राणी उद्यानाचे रेंजर्स आणि कर्मचारी बचावासाठी गेले नाहीत.

-डॉ. एच. राजामोहन, संचालक प्राणी उद्यान, गोरखपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.