Karwa Chauth 2022: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये जे काही घडते आहे त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. सध्या देशात करवा चौथचा उत्साह आहे. त्याची तयारी सुरु आहे. देशभरामध्ये हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मात्र यासगळ्यात काही सनातनी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी चक्क या सणाच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात केलेलं वक्तव्य सामाजिक शांततेचा भंग करणारे आहे.
त्या वक्तव्याचा सोशल मीडियावरुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुस्लिम मुलांनी हिंदू महिलांच्या हातावर मेहंदी काढायची नाही. असं अभियान काही हिंदूत्ववादी संघटनाकडून सुरु करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या गोष्टीचा सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे समाचार घेण्यात आला आहे. यासाठी 13 मेहंदी केंद्र हिंदू संघटनांच्यावतीनं उभारण्यात आले होते. यावर बीजेपीचे आमदार विक्रम सैनी यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम युवकांवर विश्वास करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदू महिलांनी मेहंदी काढून घेऊ नये. एवढेच नाही तर जे कुणी मेहंदी काढणार आहेत त्यांची ओळखपत्रंही तपासली जात आहे. हिंदूत्ववादी संघटनांकडून ही मोहिम चालवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील जनपद याठिकाणी करवा चौथच्या निमित्तानं हिंदू महिला मोठ्या प्रमाणावर मेहंदी काढून घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यात जे कुणी मुस्लिम हिंदू महिलांच्या हातावर मेहंदी काढणार आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यांना मेहंदी काढता येणार नाही. असा पवित्रा त्या संघटनांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, मुझफ्फरनगरमध्ये पोलीस मुग गिळून शांत बसल्याचे सांगण्यात आले आहे.
खतौली विधानसभेचे बीजेपीचे आमदार विक्रम सैनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेहंदी ज्यानं त्यानं आपआपल्या घरी काढली पाहिजे. जे कुणी मुस्लिमांकडून मेहंदी काढून घेतात त्यांनी सावध राहावं. त्यांचा हेतू काय आहे हे कळण्यास मार्ग नाही. अशावेळी सावध राहण्याची गरज आहे. असे सैनी यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.