Yogi Aditynath: देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे अशा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांचा आज शपशविधी आहे. त्याची मोठ्या (viral news) प्रमाणात तयारी झाली आहे. ग्रँड सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती (Up Election 2022) सुत्रांनी दिली आहे. देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याप्रसंगी हजर राहणार आहेत. याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची पूर्ण टीम यावेळी य़ोगींना शुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज योगींच्या शपथविधींच्या निमित्तानं आपण त्यांच्या रोजच्या जीवनक्रमाविषयी जाणून घेणार आहोत. मोदींप्रमाणे योगींचा रोजचा दिनक्रम हा पूर्णपणे वेगळा आहे. तो काय आहे हे आपण आता पाहूयात.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये योगींनी कमाल केली. आणि त्यांना त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचे दिसून आले आहे. योगींच्या नेतृत्वाखाली पक्षाला मोठं यश मिळालं आहे. योगींच्या रोजच्या दिनक्रमाविषयी सांगायचं झाल्यास त्यांचा दिवस रोज पहाटे तीन वाजता सुरु होतो. त्यानंतर ते चार ते पाचच्या दरम्यान योगा करतात. मग स्नान घेतल्यावर पूजा होते. हे सगळ्यांना माहिती आहे की, योगी आणि गोरखपूर पीठाचे अनोखे नाते आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी त्या पीठाशी जवळीक कायम ठेवली आहे. ते त्या मठात जाऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतात.
योगी हे जवळच्या गोशाळेत जातात. त्यानंतर त्यांना भेटायला आलेल्या लोकांशी ते संवाद साधतात. योगी आदित्यनाथ हे शाकाहारी आहेत. जेवणानंतर ते त्यांच्या विधानसभेतील कामकाजाची तयारी करतात. त्याचा आढावा घेतात. दिवसभरामध्ये कोणत्या मीटिंग करायच्या आहेत त्याची माहिती घेऊन त्या अटेंड करण्याचे काम केले जाते. योगींनी सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यास सुरुवात केली असल्यानं त्यांना त्याचा मोठा फायदाही झाला आहे. योगींजवळ स्वताचे कोणतेही वाहन नाही. ते सध्या लखनऊमध्ये राहणाऱ्या मुख्यमंत्री निवासमध्ये राहत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.