Lok Sabha Election : मोदींविरोधात काँग्रेसचा उमेदवार? INDIA आघाडीने दिल्या अमेठी, रायबरेलीसह १७ जागा
Lok Sabha Election 20224 Latest News : लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सध्या देशभरात वेग आला आहे, राजकीय पक्षांकडून जागावाटप निश्चीत केलं जात आहे. यादरम्यान आता उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. येथे काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर उरलेल्या ६३ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, "मला सांगायला आनंद होत आहे की, उत्तर प्रदेशात काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे आणि उर्वरित ६३ जागांवर सपा आणि इतर पक्षांचे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील "
बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा तिढा मिटला आहे. दोन्ही पक्षात झालेल्या ठरावानुसार मध्य प्रदेशात सपाला एक जागा देण्यात आली आहे. मध्य प्रदेशात खजुराहो येथील जागेवर आता समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे.
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी आघाडीची घोषणा केली असून यूपीमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. मात्र दोन्ही पक्षांमध्ये तीन जागांवरून ओढातान सुरू होती. २०१७ मध्ये जेव्हा निवडणूका झाल्या होत्या तेव्हा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता होती आणि निवडणुकीवेळा सपा-काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. आता देखील दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसला कोणत्या जागा मिळाल्या?
उत्तर प्रदेशमध्ये कांग्रेसला देण्यात आलेल्या जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्यावेळी लोकसभा निवडणूक लढवली होती त्या वारणसीच्या जागेचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान मोदी वाराणसीतून उभे राहीले तर त्यांच्याविरोधात काँग्रेस कोणता उमेदवार देणार हे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसला वाराणसी सोबतच अमेठी, रायबरेली, प्रयागराज, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाजियाबाद, कानपूर, झांसी, बाराबंकी, फतेहपूर सीकरी, सहारनपूर आणि मथुरा या जागांवर देखील काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.