अमित शहा, पियुष गोयल, नितीन गडकरी यांच्या नावे बनावट लस प्रमाणपत्र!

आरोग्य विभागाकडून चौकशीचे आदेश
covid vaccine
covid vaccinecovid vaccine
Updated on

लखनऊ : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक मोठा घोटाळा समोर आला आहे. यामध्ये अमित शहा (Amit Shah), पियुष गोयल (Puyush Goyal), नितीन गडकरी (Nitin Gadkar) यांच्यासह इतर काही केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने लस प्रमाणपत्र (Covid Vaccine Certificate) देण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या प्रमाणतपत्रांमध्ये नावांची इंग्रजी स्पेलिंग्ज चुकीची आहेत. इटवाह जिल्ह्यातील टाखा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर आरोग्य विभागानं ही फेक सर्टिफिकेट्स असल्याचं स्पष्ट केलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

covid vaccine
ओमिक्रॉन, डेल्टा एकत्रितपणे 'सुपर स्ट्रेन' तयार करू शकतात; तज्ज्ञांचा दावा
Amit Shah
Amit Shah

जी लस प्रमाणपत्रे समोर आली आहेत, त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने प्रमाणपत्रे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे या प्रमाणपत्रांवर अमित शाह यांचं नाव Amit Sha तर वय ३३ वर्षे दाखवण्यात आलं आहे. नीतीन गडकरी याचं नाव Niten Gadkar वय ३० वर्षे दाखवण्यात आलं आहे. पियूष गोयल यांचं नाव Pushyu Goyal वय ३७ वर्षे दाखवण्यात आलं आहे. तर ओम बिर्ला यांचं वय २६ वर्षे दाखवण्यात आलं आहे. यामध्ये या सर्वांनी आपला पहिला डोस १२ डिसेंबर रोजी इटवाह इथल्या एका कम्युनिटी लसीकरण केंद्रावरुन घेतल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या डोसची तारिख ५ मार्च २०२२ ते ३ एप्रिल २०२२ अशी दाखवण्यात आली आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari
covid vaccine
बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवा ; संभाजीराजे संतापले
Om Birla
Om Birla

या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर लस प्रमाणपत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणं या नावाने कोणालाही या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आलेली नाही, हे समोर आलंय. या प्रकरणी स्पष्टीकरण देताना संबंधित कम्युनिटी हेल्थ सेंटरचे (CHC) प्रभारी म्हणाले, "१२ डिसेंबर रोजी आमचे आयडी (ओळखपत्र) हॅक झाले होते. त्यामुळं हे हॅक झालेले आयडी बंद करण्याच्या मागणीसाठी आम्ही संबंधित विभागाला लेखी पत्रव्यवहारही केला होता"

covid vaccine
परब गद्दारी करतायेत...रामदास कदमांनी ठाकरेंना दिलेलं पत्र फोडलं!
Piyush Goyal
Piyush Goyal

संबंधित जिल्ह्यातील चीफ मेडिकल ऑफिसर (सीएमओ) डॉ. भगवान दास भिरोरिया म्हणाले, "कोणतरी हे कट-कारस्थान रचल्याचं दिसून येतंय. संबंधितानं मुद्दाम केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं ही लस प्रमाणपत्र तयार केली आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तपास पथक नेमण्यात आलं आहे. हे कारस्थान लवकरच उघड केलं जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()