लखनऊ- एक धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमधून समोर आले आहे. एक ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जीवन संपवण्याआधी व्यक्तीने दोन व्हिडिओ बनवले होते. एका व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसत आहे की, 'आयुष्यात काय करायचं ते करा, पण कधीच लग्न करू नका.'
'फ्री प्रेस जर्नल'च्या रिपोर्टनुसार, व्यक्तीचे नाव जगजित सिंग राणा असं आहे. को बुलंदशहरचा रहिवाशी आहे. तो गाझीयाबादमध्ये एका फ्लॅटमध्ये एकटा राहायचा. मेडिसिन विक्रीचा तो व्यवसाय करायचा. माहितीनुसार, पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून जगजित सिंगने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येआधी आपल्या मोबाईलमध्ये दोन व्हिडिओ शूट केले आहेत.