कानपूर : विधानसभा निवडणुकीचा (UP Assembly Election 2022) निकाल लागल्यानंतर येत्या १० मार्चापासूनच उत्तर प्रदेश होळीच्या उत्सवाला (Holi Celebration) सुरुवात होईल, असं सूचन विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा विजय होईल या संदर्भानं मोदींनी कानपूर येथील जाहीर सभेत हे विधान केलं. (Uttar Pradesh Holi will start ten days in advance PM Modi statement)
मोदी म्हणाले, "दुसऱ्या टप्प्यातील मतदान आणि पहिल्या टप्प्यातील मतदान यांचा ट्रेन्ड पाहता हे स्पष्ट संकेत मिळत आहेत की, राज्यात पुन्हा भाजपचं येईल. त्यामुळं योगी सरकार पुन्हा एकदा त्याचवेगानं सत्तेत परतेल. त्याचबरोबर मतदानाचा कल हे दर्शवतोय की, प्रत्येक जाती, प्रवर्गातील लोक तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक युपीचा वेगानं विकास व्हावा यासाठी मतदान करत आहेत. यामध्ये त्यांना कोणतीही शंका नाही"
त्याचबरोबर आपल्या माता-भगिनी आणि मुली यांनी स्वतः भाजपच्या विजयाचा झेंडा हाती घेतला आहे. माझ्या मुस्लिम भगिनी देखील मोदींना आशीर्वाद देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यांना माहिती आहे की, त्यांच्या बऱ्यावाईट काळात त्यांच्यासोबत त्यांचाच माणूस उभा होता, असं भावनिक विधानंही यावेळी मोदींनी केलं.
दरम्यान, गेल्या सरकारांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, "गेल्या सरकारांनी उत्तर प्रदेशला गुन्हेगार, दंगलखोर आणि गुंडांच्या माध्यमातून रात्रंदिवस केवळ लुटलं. युपीच्या जनतेनं २०१४ मध्ये त्यानंतर २०१७ मध्ये त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये आणि आता २०२२ मध्ये त्यांचा पराभव केला. त्यामुळं यंदाही पुन्हा घराणेशाहीचा पराभव होणार आहे. यावेळी रंगाचा सण होळी दहा दिवस आधीच उत्तर प्रदेशात साजरा केला जाईल. जेव्हा १० मार्च रोजी निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशा शब्दांत मोदींनी भाजपच्या विजयचा विश्वास व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.