समाजवादी पार्टीच्या डझनहून अधिक नेत्यांच्या घरांवर Income Tax ची धाड

Rajiv Rai
Rajiv Raiesakal
Updated on
Summary

माजी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जैनेंद्र यादव यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय.

आयकर विभागाच्या (Income tax department) पथकानं आज (शनिवार) सकाळी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि सपा नेत्यांच्या लखनऊ (Lucknow), मैनपुरी (Mainpuri), मऊ येथील घरं आणि कॅम्प ऑफिसवर छापे टाकले. मैनपुरीचे मनोज यादव, लखनौमधील माजी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जैनेंद्र यादव आणि मऊचे राजीव राय यांच्यासह डझनहून अधिक नेत्यांचा यात समावेश आहे. आंबेडकर पार्कजवळील (Ambedkar Park) जैनेंद्र यादव (Jainendra Yadav) यांच्या घरावर लखनऊमध्ये आयकरनं छापा टाकलाय. तर दुसरीकडं मऊ येथील सपा नेते राजीव राय यांच्या कॅम्प ऑफिसवर छापा टाकण्यात आलाय. या छाप्याची माहिती मिळताच, कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी गोंधळ घालयला सुरुवात केलीय. दरम्यान, गदारोळ वाढण्याच्या भीतीनं मोठा पोलीस (UP Police) बंदोबस्त घटनास्थळी मागवण्यात आलाय.

Rajiv Rai
राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत

मऊमध्ये (Mau) आयकर पथकानं आज सकाळी कोतवाली शहरातील सहादतपुरात असलेल्या एसपीचे (Samajwadi Party) राष्ट्रीय सचिव राजीव राय (Rajiv Rai) यांच्या कॅम्प ऑफिसवर छापा टाकला. यादरम्यान वाराणसीच्या आयकर विभागानं राजीव राय यांना त्यांच्या घरात रोखलं. राय यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय. खरं तर सपा सरकारच्या काळात वीज महामंडळाच्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामात राजीव राय यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.

Rajiv Rai
भाजपसोबत युती करताच कॅप्टनचा काँग्रेसला झटका

मनोज यादव यांच्या घरावर छापा

दरम्यान, आयकर विभागानं शनिवारी पहाटे पंजाबी कॉलनी, मैनपुरी येथे राहणारे राज्य कंत्राटदार मनोज यादव (Manoj Yadav) यांच्या घरावर छापा टाकला. 12 वाहनांच्या ताफ्यासह दाखल झालेल्या आयकर विभागाच्या पथकानं संपूर्ण घराला आतून कुलूप लावलंय. घराबाहेर स्थानिक पोलिसांचा पहारा आहे. कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीय. सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाचे पथक घरामध्ये तपास करत आहे. छापेमारीमागच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Rajiv Rai
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, ही क्षुल्लक गोष्ट

माजी मुख्यमंत्र्यांचे OSD यादव यांच्या घरावरही छापा

लखनऊमध्ये आंबेडकर पार्कजवळ असलेले माजी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जैनेंद्र यादव यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय. तासनतास घराची झडती घेतलीय. शिवाय, आयकरनं अनेक कागदपत्रं आपल्या सोबत घेतली आहेत. यावेळी घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.