गावच्या नावाला निसर्गाची जोड असल्याने येथील वातावरण तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाते.
उत्तर प्रदेशात असे एक गाव आहे. जिथे प्रवेश करण्यासाठी तुम्हाला 20 रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. म्हणजेच 20 रुपये दिल्यानंतरच या गावात एंट्री मिळते. गाझीपूर जिल्ह्यापासून 15 किलोमीटर अंतरावर खुरपी हे गाव निसर्गाने नटले आहे. गावच्या नावालाही निसर्गाची जोड असल्याने असून येथील वातावरण तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाते. या गावात प्राणीसंग्रहालय आणि पुस्तकांची बाग आहे. (uttar pradesh khurpi nature village)
गावात एक तलाव आहे त्यात आधुनिक तंत्रज्ञानाने मत्स्य व कुक्कुटपालन केले जाते. रोज शेकडो लोकांची भोजनाची मोफत व्यवस्था केली जाते. शिवाय सैन्यदलाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली व्यायामशाळाही आहे. या तलावाच्या काठावर बसून येथील प्रसिद्ध 'कुल्हड' चहाचा आस्वाद घेऊ शकता. येथे घोडेस्वारी आणि नौकाविहाराचा अनुभवही घेता येतो. येथे मिळणारे जेवणे हे देशी चवीचे आहे. गावातील एक तरुण सिद्धार्थ रायने हे गाव वसवले आहे. एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर ते गावी परतले आणि त्यांनी हा प्रयोग केला आहे.
गाझीपूर येथील खुरपी गाव चर्चेत आहे. गावातील निसर्ग सौंदर्यासोबत गाव तयार करण्याच्या मॉडेलचीही खूप चर्चा आहे. येथील घरगुती कुक्कुटपालनाची अंडी बाजारात विकली जात आहेत. या कामात जवळपास 4 ते 5 लोक गुंतलेले आहेत. याशिवाय इतर ५० हून अधिक गुरे आहेत. यापासून मिथेन वायू तयार केला जातो आणि शेणाचा वापर गांडुळ खातासाठी केला जातो. गांडुळांमुळे त्याचे रुपांतर सेंद्रिय खातात होते. हे सेंद्रिय खत गावातील शेतांसाठी न वापरता बाहेरील शेतकऱ्यांना विकले जाते. या गावात गायी, शेळ्या, मत्स्यपालन, बदके, कोंबडा, गांडुळे, ससे, तीतर आहेत. एक शहामृगही आहे ज्याच्यासोबत लोक सेल्फी घेण्यासाठी येतात.
खुरपी गाव दीड एकरात पसरले आहे. स्वयंरोजगाराची साखळी म्हणून याकडे पाहिले जाते. याबाबत सिद्धार्थ सांगतो, 'एमबीए केल्यानंतर बंगळुरूला गेलो आणि तिथे चांगल्या पॅकेजवर नोकरीही मिळाली. 2014 मध्ये असे काही करता येईल अशी एक कल्पना सुचली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी ते गावी परतले. त्यानंतर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहू लागले. त्यांच्यासोबत ते जोडले गेले आणि त्यांनी काम सुरु केले.
वाराणसी हायवेपासून पाच किमी अंतरावर असलेल्या अगस्ता गावाजवळील शेताच्या मधोमध त्यांनी सुमारे दीड एकरात गायींचे संगोपन सुरू केले. यामध्ये त्याला मित्र अभिषेकची मदत झाली. पुढे त्याने दुधाचा व्यवसाय सुरू केला. हळुहळू शेजारच्या गावांना गाई-म्हशींसाठी आर्थिक मदत करून त्यांचे दूध विकत घ्यायला सुरुवात केली. यानंतर त्याला कुक्कुटपालनाची कल्पना सुचली. उरलेलं शेण गांडुळ खतासाठी देण्यास सुरुवात केली. गावाच्या मधोमध तलाव करून मत्स्यपालन, बदक पालन सुरू केले. आज शेकडो लोक आपल्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने उत्पन्न मिळत आहे, असंही सिद्धार्थ यांनी सांगितलं आहे.
खुरपी गावात प्रभू यांचे स्वयंपाकघर आहे. जिथे रोज 100 ते 150 लोकांसाठी जेवण तयार केले जाते. ज्यांना दोन वेळेचे जेवण मिळत नाही अशा लोकांची सोय इथे केली जाते. जेव्हा गावात आलो तेव्हा अनेक ठिकाणी गरिबांना दोन वेळच्या जेवणासाठी त्रास होतो असे पाहिले आणि त्याने ही समस्या लक्षात घेत प्रभूंचे स्वयंपाकघर सुरू केले. सर्वसामान्यांनी दिलेल्या देणगीतून रोज हे जेवण तयार केले जाते. सिद्धार्थ यासाठी दरवर्षी अनेक राज्यांना भेटी देतो, दान केलेले धान्य या स्वयंपाकघरात सुपूर्द करतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.