बनावट नावानं 36 वर्षे काम करणारी व्यक्ती आता 31 डिसेंबरला निवृत्त होत आहे.
गोरखपूरमध्ये (Gorakhpur) बनावट नावानं 36 वर्षे काम करणारी व्यक्ती आता 31 डिसेंबरला निवृत्त होत आहे. या प्रकरणी गोरखपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी रविप्रकाश चतुर्वेदी (Raviprakash Chaturvedi) या बनावट नावानं काम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंडाधिकारी चौकशी केल्यानंतर, 6 डिसेंबर रोजीच सरकारला अहवाल पाठवला होता. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, आरोपी बडे बाबू रविप्रकाश चतुर्वेदी यांनी गोरखपूर समाजकल्याण विभागात पदावर 36 वर्षे सेवा पूर्ण केली आणि आता ते या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. दुसरी व्यक्ती ज्याच्या नावानं रविप्रकाश चतुर्वेदी काम करत आहे, तो त्याच्या गावातील शेजारी असून त्याचं नाव रवि प्रकाश मिश्रा (Ravi Prakash Mishra) असं आहे. याप्रकरणी रविप्रकाश मिश्रा यांनी तक्रार केली होती. रविप्रकाश चतुर्वेदी हे त्यांच्या नावावर नोकरी करत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं दंडाधिकारी पथक स्थापन करून चौकशीचे आदेश दिले.
या तपासात असं आढळून आलं, की 4 फेब्रुवारी 1985 रोजी रविप्रकाश मिश्रा यांच्या नावानं नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं होतं, तेव्हापासून रविप्रकाश चतुर्वेदी हे मिश्रा यांच्या नावानं नोकरी करत आहेत. या प्रकरणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी वशिष्ठ नारायण सिंह (Vashishtha Narayan Singh) यांनी सांगितलं की, जिल्हाधिकाऱ्यांनी दंडाधिकारी चौकशी करून 6 डिसेंबर रोजीच शासनाला अहवाल पाठवला. त्यानंतर आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता रविप्रकाश मिश्रा या नावानं 36 वर्षांपासून कार्यरत असलेले रविप्रकाश चतुर्वेदी 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांच्या नगरमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा अहवाल सरकारनं इतक्या हलक्यात का घेतला? असा सवाल उपस्थित होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.