गंगा एक्स्प्रेस (Ganga Expressway) वे हा उत्तर प्रदेशातील सर्वात लांब मार्ग असल्याचं म्हटलं जातंय.
गंगा एक्स्प्रेस (Ganga Expressway) वे हा उत्तर प्रदेशातील सर्वात लांब मार्ग असल्याचं म्हटलं जातंय. त्याची लांबी 594 किमी असून गंगा एक्स्प्रेस वे मेरठ (Meerut) ते प्रयागराजपर्यंत (Prayagraj) उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे यूपीच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडला जाईल, तर एक्सप्रेस वे मेरठ-बुलंदशहर रस्त्यावर (NH-334) मेरठच्या बिजौली गावातून सुरू होईल आणि प्रयागराज बायपास (NH-19) करुन जुडापूर दांदू गावाजवळ संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज शाहजहांपूरमध्ये 36,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 594 किमी लांबीच्या गंगा एक्सप्रेस वे'ची पायाभरणी केली.
यावेळी पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले, जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेश एकसंघ होतो, तेव्हा देशाची प्रगती होत असते. त्यामुळंच यूपीच्या विकासावर आमचं लक्ष असणार आहे. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रानं आम्ही उत्तर प्रदेशच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पूर्वी शेतकऱ्यांना बँकांच्या दारात प्रवेश मिळत नव्हता. पण, आता शेतकऱ्यांच्या मालाची किंमत एमएसपीवर खरेदी केली जात असून पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाताहेत. समाजात जो कोणी मागे आहे, मागासलेला आहे त्यांना सक्षम करणं, विकासाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
वर्षांपूर्वी राज्यातील काही भागातच वीज उपलब्ध होती. मात्र, आता हे चित्र बदललं आहे. आज यूपीमध्ये सर्वकाही ठीक आहे. यापूर्वी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत होता. तुम्हाला पाच वर्षांपूर्वीची स्थिती आठवते, राज्यातील काही भाग वगळता इतर शहरं आणि गावांमध्ये वीज मिळत नव्हती. मात्र, आता सरकारनं केवळ यूपीमध्ये सुमारे 80 लाख मोफत वीज जोडणी दिली नाही, तर प्रत्येक जिल्ह्याला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त वीज दिली जात आहे. आपली तिजोरी भरावी म्हणून यापूर्वी असे मोठे प्रकल्प कागदावर सुरू केले जात होते, आज तुमची क्षमता वाढावी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत, असंही पंतप्रधान म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.