Mukhtar Ansari: बाहुबली आमदार मुख्तार अन्सारीला १० वर्षांचा तुरुंगवास, पाच लाखांचा दंड; वाचा काय आहे प्रकरण

त्याच्या मित्रालाही ५ वर्षांचा कारावास आणि मोठ्या दंडाची शिक्षा झाली आहे.
Mukhtar Ansari
Mukhtar AnsariEsakal
Updated on

गाझीपूर : कपिल देव सिंह यांची हत्या आणि मीर हसन यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गँगस्टर आणि नंतर उत्तर प्रदेशचा आमदार बनलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याला गाझिपूर कोर्टानं शुक्रवारी १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

तसेच ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गँगस्टर अँक्ट अंतर्गत त्याच्यावर करावाई करण्यात आली आहे. तसेच त्याचा जवळचा सहकारी सोनू यादव याला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Uttar Pradesh Politition Mukhtar Ansari jailed for 10 years in Gangster Act case)

Mukhtar Ansari
Israel-Hamas War: हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत! हमासला नमवण्याची तयारी सुरु

मी तर तुरुंगात होतो - अन्सारी

अन्सारी या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यानं आपले वकील अॅड. लियाकत यांच्यामार्फत कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितलं की, या प्रकरणाशी माझा संबंध नाही. मी २००५ पासून तुरुंगात आहे. आम्ही हायकोर्टात या शिक्षेविरोधात अपिल करणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. (Latest Marathi News)

Mukhtar Ansari
Babanrao Dhakne : अन् 'त्या' दिवशी भगवानगडावर झाला नेतृत्वबदल.. ढाकणे विरुद्ध मुंडे; असा पेटला टोकाचा संघर्ष

काय आहे प्रकरण?

सन २००९ मध्ये कपिल देव सिंह यांची हत्या तसेच मीर हसन या व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी मुख्तार अन्सारीवर गुन्हा दाखल झाला होता. पण नंतर २०११ आणि २०२३ मध्ये अन्सारीला या दोन्ही खटल्यात कोर्टानं दोषमुक्त ठरवलं होतं. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, याच वर्षी एप्रिल महिन्यात अन्सारीला १९९६ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते नंदकिशोर रुंगटा आणि २००५ मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्या प्रकरणात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.