हॅक केली निवडणूक आयोगाची साईट; हजारो बनावट ओळखपत्र बनवणारा अटकेत

Election Commission Of India
Election Commission Of India
Updated on

सहारनपूर: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने चक्क निवडणुक आयोगाची वेबसाईट हॅक केली आहे. या व्यक्तीला सध्या हॅकींग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी विपुल सैनीने आपल्या कम्प्यूटरच्या दुकानामधून हजारोंच्या संख्येने बनावट मतदान ओळखपत्र बनवली आहेत. विपुल मध्य प्रदेशातील अरमान मलिक या व्यक्तीच्या इशाऱ्यावर काम करत होता आमि त्याने तीन महिन्यामध्ये १० हजारहून अधिक ओळखपत्रे बनवली होती. पोलिसांच्या तपासामध्ये विपुलच्या खात्यात तब्बल ६० लाख रुपये आढळून आले आहेत. त्याच्या खात्यात इतकी रक्कम कुठून आली, याबाबतही सध्या तपास सुरु आहे.

Election Commission Of India
चला, एकजूट होऊया! सोनिया गांधींनी बोलावली समविचारी विरोधकांची बैठक

पासवर्डद्वारे करायचा वेबसाईटवर लॉगिन

सहारनपुरचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक एस चेन्नपा यांनी याबाबत म्हटलंय की, विपुल सैनीने आपल्या दुकानामध्ये हजारोंच्या संख्येने बनावट ओळखपत्रे बनवली होती. विपुल आयोगाच्या वेबसाईटवर अधिकारी जो पासवर्ड वापरायचे त्याच पासवर्डद्वारे लॉगइन करायचा. आयोगाला याबाबतची कुणकुण लागल्यावर त्यांनी एजन्सीजना याबाबतची माहिती दिली. तपासानंतर विपुलवर संशय बळावला आणि त्याला अटक करण्यात आली.

Election Commission Of India
ट्विटरनंतर राहुल गांधींचं इन्स्टाग्राम अकाउंटही ब्लॉक होणार?

आरोपीच्या बँक खात्यात मिळाले ६० लाख रुपये

पोलिस अधिक्षक चेन्नपा यांनी म्हटलंय की, त्याच्या खात्यात ६० लाख रुपये मिळाले आहेत. यानंतर त्याच्या व्यवहारांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. त्याच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली, याबाबतही सध्या तपास केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()