लखनऊ : समाजवादी पार्टीकडून काल उत्तर प्रदेशात दोन टप्प्यात एकूण ३१ लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. तसेच राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हजेरी न लावण्यावरुन काँग्रेस-सपाच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
पण आता या सर्व चर्चा सपा आणि काँग्रेसनं संयुक्त पत्रकार परिषद घेत खोडून काढल्या आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सपा आणि काँग्रेसमध्ये युती कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Uttar Pradesh SP has announced 31 candidates but alliance with Congress still live says Akhilesh Yadav)
उत्तर प्रदेशात काँग्रेस लढवणार १७ जागा
या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. बाकी इतर सर्व जागांवर समाजवादी पार्टी आपले उमेदवार उतरवणार आहे. यामध्ये हाथरसच्या जागेवरुन सपा आणि सीतापूरच्या जागेवरुन काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, सपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरुन तडजोड काल रात्रीपर्यंत सुरु होती. यामुळं अखिलेश यादव यांनी घोषणा करुनही रायबरेलीत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत त्यांनी हजेरी लावली नाही. ही न्याय यात्रा मंगळवरी अमेठी, रायबरेलीहून पुढे लखनऊ आणि बुधवारी सकाळी उन्नावच्या दिशेनं रवाना झाली. (Latest Marathi News)
पण लखनऊमध्ये देखील राहुल गांधींच्या यात्रेत सपाचा कोणताही प्रतिनिधी सहभागी झाला नसल्यानं आता उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी तुटल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर सपानं मंगळवारी रात्री उशीरा आपल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये वाराणसीच्या जागेवरही सपानं आपला उमेदवार जाहीर केला. जिथं आधी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं म्हटलं जात होतं.
अखिलेश यादव म्हणाले, अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या यात्रेला गैरहेजरी लावल्याप्रकरणी जी चर्चा सुरु आहे त्यावर बोलताना यादव म्हणाले, "सर्वकाही ठीक ठाक असून शेवटही ठीकच आहे. होय आमच्यात युती कायम आहे, कुठलाही वाद नाही. लवकरच सर्वकाही समोर येईल आणि स्पष्ट होईल" (Latest Maharashtra News)
सपानं आत्तापर्यंत ३१ जागांवर केली उमेदवारांची घोषणा
समाजवादी पार्टीनं मंगळवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. ३० जानेवारी रोजी त्यांनी पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये १६ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला तिसरी यादी जाहीर केली. त्यामुळं आत्तापर्यंत सपानं उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३१ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.