Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

मुलांच्या चेहऱ्यावर काळं फासत गावातून फिरवल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Crime Against Dalits
Crime Against Dalitssakal
Updated on

बहराईच : गहु चोरल्याचा आरोप करत दलित समुदायातील तीन अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याचा खळबळजनक प्रकार उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे घडला. त्या मुलांच्या चेहऱ्यावर काळे फासत गावातून फिरवल्याचा संतापजनक घटना घडली. केवळ पाच किलो गहु चोरल्याचा आरोप करत गावातील गुंडांनी मुलांना तालिबानी शिक्षा सुनावली.

Crime Against Dalits
Ratan Tata: रतन टाटा अनंतात विलिन! शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

नानपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूर टेडिया गावात मंगळवारी घटना घडल्याचे पेालिसांनी सांगितले. अल्पवयीन मुले १२ ते १४ वयोगटातील आहेत. आरोपींनी सुरुवातीला त्या मुलांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचे मुंडण केले. हातावर ‘चोर’ आहे असे लिहले. एवढ्यावरच हे आरोपी थांबले नाही तर तोंडाला काळे फासत त्यांचे हात बांधून गावातून फिरवले. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली.

Crime Against Dalits
Ratan Tata: राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; रतन टाटांसाठी केली 'ही' महत्वाची मागणी

या घटनेनंतर अल्पवयीन मुलांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार केली असून आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. याप्रकरणातील अन्य आरोपी माजी सरपंच सानू फरार आहे. एका पोल्ट्री फार्मचे मालक नाजीम आणि कासीम यांनी या मुलांवर पाच किलो गहू चोरल्याचा आरोप केला होता.

Crime Against Dalits
Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

या दोघांनी त्या मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच विजेच्या तारांनी त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. सानू आणि इनायत हे त्या आरोपींसमवेत होते आणि त्यांनी मुलांना धमकाविले देखील होते. आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर या कृत्याचे चित्रीकरण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. यादरम्यान, पोल्ट्री फार्म येथे कामावर न आल्याने त्या तिघांना नाजीम आणि कासिम यांनी त्रास दिल्याचे नातेवाइकांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.