Flood : उत्तराखंड, आसामचे जनजीवन विस्कळीत; हरिद्वारमध्ये गाड्या पाण्यात

उत्तराखंड, आसामसह काही राज्यांतील बहुतांश भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Dibrugad Flood Water
Dibrugad Flood Watersakal
Updated on

नवी दिल्ली/हरिद्वार - उत्तराखंड, आसामसह काही राज्यांतील बहुतांश भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. हरिद्वार येथे पावसामुळे वाहनतळात असलेल्या गाड्या नदीत वाहून गेल्या.त्याचवेळी दिल्लीत पावसाने आज उसंत घेतली. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी आज पावसाने फटका बसलेल्या भागाला भेट दिली. दुसरीकडे आसामच्या दिब्रुगड येथे तीन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत आहे. अनेक भागात वीज गुल आहे.

हरिद्वार येथे आज अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वाहनतळाचे शुल्क वाचविण्यासाठी नागरिकांनी सुखी नदीच्या काठावर गाड्या लावल्या होत्या. मात्र या पावसाने त्या डोळ्यादेखत वाहत गेल्या. तेथून काही अंतरावरच सुखी नदी मुख्य गंगा नदीला जाऊन मिळते आणि त्यामुळे गाड्या गंगा नदीत बुडाल्या.

उत्तर भारतात अनेक भागात पाऊस पडत आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार येथे मुसळधार पाऊस पडल्याने कोरड्याठाक सुखी नदीच्या पात्रात पाणी आले. आज सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश असताना दुपारी वातावरण बदलले आणि पाऊस सुरू झाला. शहरात अनेक भागात पाणी साचले. काही गाड्या ‘हर की पौडी’जवळ अडकल्या तर काही वाहून गेल्या. शहर पोलिसांनी नदीत वाहणाऱ्या गाड्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीने मोहीम सुरू केली होती. पावसामुळे गंगा नदीची पातळी वाढल्याने नदीकाठावरच्या सुमारे आठ चार चाकी गाड्या वाहून गेल्या.

दिल्लीत २८ जून रोजी चोवीस तासात नऊ इंच पाऊस पडल्याची नोंद झाली. हा विक्रमी पाऊस मानला जात असून यापूर्वी १९३६ मध्ये ९.२७ इंच पाऊस पडला होता. दिल्लीत पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री बांधकामस्थितीतील इमारतीच्या एका खड्ड्यात तीन मजूर फसले आणि ते बाहेर पडू शकले नाहीत. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. तेथे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. आज सकाळी या तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्लीतील पावसाने फटका बसलेल्या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत अधिकारी होते. तैमूर नगर, बारापुला, आयटीपीओ, तिलक ब्रिज, कौशक नाला, गोल्फ लिंक्स आणि भारती नगर भागाला त्यांनी भेट दिली. अनेक भागात मातीचे ढिगारे साचलेले दिसले तसेच जागोजागी नाल्या तुंबलेल्या दिसल्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आले. सफदरजंग येथील वेधशाळेने शुक्रवारी तीन तासांत पहाटे अडीच ते साडेपाच या वेळेत १५३.७ मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे.

तीन दिवसांपासून पाऊस

दिब्रुगड: गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने शहरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक मुन्ना राय यांनी शहरात सर्वत्र पाणी असल्याचे सांगितले. त्यामुळे कामावर जाता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील प्रत्येक घरात पाणी शिरले आहे. या पुराचा सर्वच भागांना फटका बसला असून त्यापासून सीआरपीएफची छावणी देखील अपवाद राहिली नाही. पोलिस छावणी भागातील रस्ते आणि फुटपाथ देखील पाण्याखाली गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.