डेहराडून : भाजपमधून पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले उत्तराखंडचे माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंह रावत यांनी पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ पकडला. सून अनुक्रिती गुसंई रावत हिच्यासह त्यांनी शुक्रवारी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर डेहराडूनमधील काँग्रेस भवनावर मोठ्या प्रमाणात आतषबाजी व घोषणाबाजी करण्यात आली. (Uttarakhand Election Updates)
पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून हरकसिंह यांना भाजपमधून काढून टाकण्यात आले. निवडणुकीत तिकीट देण्याच्या अटीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. पक्षाकडून त्यांना किंवा त्यांच्या सुनेला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हरकसिंह यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोंदियाल, विरोधी पक्षनेते प्रीतमसिंह आणि प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव हे प्रयत्न करीत होते.
मी ‘वापरा व फेकून’ या लायकीचा आहे, असे भाजपला वाटले. मी खूप निराश झालो होतो. वचन दिल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मैत्रीचे धागे मी शेवटच्या तुटू दिले नाहीत. काँग्रेस १० मार्च रोजी उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल तेच माझ्यासाठी प्रायश्चित्त असेल’’
- हरकसिंह रावत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.