उत्तराखंडामध्ये रस्सीखेच; पुष्कर धामी की त्रिवेंद्र रावत, कोण होणार मुख्यमंत्री?

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.
Pushkar  Dhami,amit shaha
Pushkar Dhami,amit shahaEsakal
Updated on

उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) बहुमत मिळाल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला उधाण आले. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Election) कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता. भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami) तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) आणि 'आप'ने अजय कोठियाल यांना दिली होती. (Uttarakhand Election Results 2022) दरम्यान उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या निवासस्थानी आज बैठक सुरु आहे. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंह धामी आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशिवाय आणखी एक नाव चर्चेत आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांचे मतही महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने प्रचंड बहुमत मिळवले आहे. कार्यरत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, खतिमा विधानसभा मतदारसंघातून त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

Pushkar  Dhami,amit shaha
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिला राजीनामा

उत्तराखंडचा मुख्यमंत्री कोण होणार हे आजच्या बैठकीत ठरणार आहे. यापूर्वीच पुष्कर धामी, त्रिवेंद्र रावत आणि रमेश पोखरियाल यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चेला उधान आले आहे. यावेळी जेपी नड्डाही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी या तिघांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, पक्ष हायकमांड सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा कोण असेल हे पक्ष ठरवेल.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, मला गृहमंत्र्यांनीही बोलावले आहे. त्यांना ज्या काही पक्षाकडून सूचना आल्या आहेत ते आम्हाला सांगितले आहे. नवे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी ते म्हणाले, यासाठी अनेक नवे चेहरे सध्या मैदानात आहेत. मी मुख्यमंत्री होणार की आणखी कोणी हे सांगू शकत नाही. हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.