Uttarakhand: 'उत्तराखंड हे जगातील पहिलेच असे राज्य आहे जिथे 'जीईपी' चं झालं अनावरण'; सीएम धामी..

CM Dhami inaugurated environment generation (GEP) today: आपण ज्या प्रकारे विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहोत त्याच प्रकारे आपल्याला पर्यावरणाचे देखील संवर्धन करणे खूप गरजेचे आहे, आणि जीईपी त्याचा एक निर्देशांक आहे.
CM pushkarsingh dhami.
CM pushkarsingh dhami.sakal
Updated on

CM Dhami: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज पर्यावरण उत्पादन (जीईपी) चं उद्घाटन केलं. तसेच पत्रकार परिषेदेमध्ये सांगितले की, उत्तराखंड हे जगातील पहिलेच असे राज्य आहे जिथे जीईपी चं अनावरण झालं आहे.

ते म्हणाले,"आज हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिन आहे. आपले पुर्वज आपल्याला चांगलं आरोग्य, हवा, पाणी आणि मानवाच्या प्राथमिक गरजेसाठी लागणारा साठा देऊन गेले आहेत. पूर्ण वायुमंडळ हे शुद्ध हवेसाठी आच्छादित आहे. ज्या प्रकारे आपण विकास करत पुढे जात आहोत त्याच प्रकारे आपल्याला पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करायचे आहे.

CM pushkarsingh dhami.
Infosys Freshers Hiring : इन्फोसिसमध्ये होणार फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची मोठी भरती; जाणून घ्या प्लॅन

येणाऱ्या काळासाठी सुद्धा आपल्याला हा साठा जतन करावा लागणार आहे कारण भविष्याचे आव्हान आता आपल्या पुढे आहे. ग्रीन बोनससाठी आपण मागणी करत होतो पण आज मागच्या तीन वर्षांचे आकडे समोर आले आहेत, त्यामध्ये आपल्याला अजून चांगलं काम करण्याची संधी मिळेल. हा निर्देशांक भारत सरकारच्या नीति आयोगामध्ये फायदेशीर ठरु शकतो. अनेक ओढे- नाले कोरडे पडले आहेत त्याला पुनर्जिवीत करून त्यांच्याद्वारे कामे करू शकतो. आता आमच्याकडे संपूर्ण शहराची धारण क्षमता काय असेल याबद्दलचा अहवाल देखील आहे. challenged

नीति आयोग आणि मुख्यमंत्री कॉन्क्लेवमध्ये यासंबंधीत आम्ही बातचीत करणार आहोत. आज राज्याची लोकसंख्या १.२५ करोड जरी असली तरी, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांचा विचार केला तर ८ करोड पेक्षा जास्त लोक पर्यटनासाठी राज्यात भेट देतात. त्यामुळे आमच्या सारख्या राज्याला वेगळे असे एक विकास मॉडेल असणं गरजेचे आहे, तसेच त्याला मिळणारं बजेट देखील वेगळं असावं, पूर्ण देशासाठी केवळ एकचं योजना नसावी. खळखळ वाहणाऱ्या नद्या आज कोरड्या ठाम पडल्या आहेत आम्ही त्यांना दुसऱ्या नदीसोबत संगम करण्याचा प्रयत्न करू".

CM pushkarsingh dhami.
Chhattisgarh : ‘आयईडी’ स्फोटात दोन जवान हुतात्मा;छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला,शोधमोहिम सुरू

कावड मार्गावर नावाच्या पाट्या लावण्यास काही हरकत नाही..

सीएम धामी म्हणाले, "लोकं आपली ओळख दाखवून कामे करतील असा आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे. यामध्ये काही गैर नाही, आमचं राज्य बांधिलकी जपणारं राज्य आहे आणि आम्ही एकत्रितपणे राहतो. त्यामुळे कावड मार्गावर आपल्या ओळखीसह नाव लिहीलं तरी कसलीच अडचण नाही."

चारधामावर राजकारण नको..

केदारनाथ धामच्या २२८ किलो सोन्याच्या मुद्यावर सीएम धामी यांनी मौन बाळगलं ते म्हणाले की, "त्या विषयावर मी काही बोलू इश्चित नाही कारण आमचे संत आणि मंदिर समिती यांनी आधीच सांगितले आहे की ते तथ्याच्या पलीकडे आहे. मी राजकारण्यांना विनंती करतो की त्यांनी चारधामावर राजकारण करू नये."

CM pushkarsingh dhami.
UP Politics : प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे उत्तर प्रदेशात संकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.