CM Pushkar Singh Dhami: हिंदूंवर होणारा अत्याचार थांबवावा...भाजपा युवा मोर्चाने काढली तिरंगा बाईक रॅली; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

Bike rally was organized by the BJP Youth Wing in Roorkee: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. देशामधील एकात्मता टिकून राहावी हे या रॅलीचं उद्देश होतं.
CM Pushkar Singh Dhami in bike rally
CM Pushkar Singh Dhami in bike rallysakal
Updated on

Uttarakhand: रुडकीमधील भाजपा युवा मोर्चेच्या नेतृत्वामध्ये तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नेहरू स्टेडियमवरून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला तसेच स्वत:सुद्धा रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, या रॅलीच्या माध्यमातून देशामध्ये एकात्मतेची भावना टिकून राहावी असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. देशातील एकता आणि अखंडता टिकून राहण्यासाठी आपल्याला एकत्रित होणे गरजेचे आहे, असे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शोभाराम प्रजापती यांनी म्हटले.

रुडकीचे आमदार प्रदिप बत्रा यावेळी म्हटले, 'या रॅलीच्या माध्यातून नागरिकांना देशाप्रती असलेल्या जबाबदारीचं महत्व कळून ते एकजुट दाखवतील'. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष गौरव कौशिक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री धामी यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे तरुण वर्गामध्ये उत्साह दिसून आला. रॅलीची सुरूवात नेहरू स्टेडियमवरून झाली. पुढे मुख्य बाजारातून रुडकी महानगरपालिकेच्या समोर आली. त्यानंतर चंद्रशेखर चौकातून सिविल लाईनकडे गेली आणि शेवटी महाराणा प्रताप चौकामध्ये या रॅलीची सांगता झाली.

रॅलीदरम्यान शहरातील विविध ठिकाणांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीमध्ये माजी मंत्री कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन, जिल्हा पंचायत अध्यक्ष किरण चौधरी, जिल्हा प्रभारी आदित्य चौहान, जिल्हा सरचिटणीस प्रवीण संधू यांनी देखील सहभाग घेतला होता.

हिंदूंवर होणारा अत्याचार थांबवावा...

नेहरू स्टेडियमवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार बंद करावा अशी मागणी देखील केली. हातामध्ये तिरंगा घेत कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. बांग्लादेशमध्ये हिंदूंसोबत जे घडत आहे ते काही ठीक नाही. तत्काळ हिंदूंवर होणारा अत्याचार थांबवावून दोषींवर कारवाई व्हावी असे देखील कार्यकर्ते म्हणाले.

CM Pushkar Singh Dhami in bike rally
CM Dhami: उत्तराखंडमध्ये लवकरच AI चे सेंटर ऑफ एक्सीलेन्स; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.