Uttarakhand : प्रभू श्री रामांचे उत्तराखंडशी अतूट नाते, त्यांच्या कृपेनेच जनतेच्या सेवेची संधी मिळाली : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

अयोध्येत देवभूमी उत्तराखंडमधील कलाकार सादर करत आहेत 'रामलीला'
Uttarakhand : प्रभू श्री रामांचे उत्तराखंडशी अतूट नाते, त्यांच्या कृपेनेच जनतेच्या सेवेची संधी मिळाली : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
Updated on

Uttarakhand :

भगवान श्रीराम यांचा उत्तराखंडशी अतूट नाते आहे. सरयू नदीचे उगमस्थान ज्याच्या काठावर भगवान श्री रामाचे पिता आणि महाराज दशरथ यांनी वंश वाढण्यासाठी तपश्चर्या केली होती, ते ठिकाण बागेश्वर जिल्ह्यात आहे. लंकाधिपती रावणाचा वध करून जेव्हा श्रीराम अयोध्येला परतले आणि श्री राम अयोध्येचे राजे झाले. तेव्हा देवप्रयागच्या रघुनाथ मंदिरात अहंकारी रावणाचा वध केल्याबद्दल पितृ यज्ञ केला होता,अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी हल्दवानी येथे आयोजित रामोत्सव कार्यक्रमाला संबोधित केले,त्यावेळी ते बोलत होते. श्री राम हे देशाचा आत्मा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता अयोध्येत रामलीला सादर केली जात आहे, ती देवभूमीतील कलाकार साकारत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशातील सर्वोत्कृष्ट रामलीला ही उत्तराखंडची असल्याचे  गौरोवोद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी काढले आहेत.

Uttarakhand : प्रभू श्री रामांचे उत्तराखंडशी अतूट नाते, त्यांच्या कृपेनेच जनतेच्या सेवेची संधी मिळाली : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
Uttarakhand: उत्तराखंड मधील उद्योजकांचे सहभागीदार उत्तराखंड राज्य असेल मुख्यमंत्र्यांचा रोड शो मध्ये विश्वास

राम महर्षी वाल्मिकींचाही आहे. राम शबरीचा आहे, राम निषादराजाचा आहे, राम विभीषणाचा आहे, राम सुग्रीवाचा आणि हनुमानाचाही आहे. राम तुमचाही आहे, राम आमचाही आहे. राम सर्वांचा आहे, म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आहेत.

प्रभू श्री राम हे आपले आदर्श आहेत ज्यांचे कार्य मानवी जीवनात अनुकरणीय आहेत. प्रभू रामासाठी मी एवढेच म्हणू शकतो की राम हा देशाचा आत्मा आहे, आदर, अभिवादन, पूजा, संवाद आणि सहानुभूती आहे, राम देशाचा आहे आणि देश रामाचा आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Uttarakhand : प्रभू श्री रामांचे उत्तराखंडशी अतूट नाते, त्यांच्या कृपेनेच जनतेच्या सेवेची संधी मिळाली : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
Uttarakhand: मुंबई पाठोपाठ या राज्यात बनावे फिल्म डेस्टिनेशन, अनुपम खेर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुढे ते म्हणाले की, या भगवंतांच्या भूमीची सेवा करण्याची जी संधी आम्हाला मिळाली आहे. ती आमच्या ‘विकल्प रहित संकल्प’ मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांच्या आदर्शांचे पालन करून पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. उत्तराखंड राज्य हे सर्वोत्कृष्ट राज्य होण्यासाठी भ्रष्टाचाराच्या रुपात रावण आणि नशेच्या रुपात कुंभकर्णाचा नायनाट करणे हे आमचे प्राधान्य आहे.

युवकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी क्रीडा उपक्रम विकसित केले जात आहेत. युवकांसाठी तसेच क्रीडाप्रेमींसाठी क्रीडा उपक्रम विकसित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Uttarakhand : प्रभू श्री रामांचे उत्तराखंडशी अतूट नाते, त्यांच्या कृपेनेच जनतेच्या सेवेची संधी मिळाली : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
Uttarakhand : शिख गुरूंनी देशाला जोडून ठेवण्याचे काम केले : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

रामलल्ला 22 जानेवारीला अयोध्येत विराजमान होणार आहेत आणि ही एक संधी आहे. ज्याची आपण वर्षानुवर्षे वाट पाहत होतो. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी देशवासीयांना रामोत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे. 22 जानेवारीला प्रभू रामाचा जयजयकार करून सर्वांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

एकीकडे रामभक्तांची श्रद्धा लक्षात घेऊन आम्ही रेल्वेमंत्र्यांना डेहराडून ते अयोध्याजी दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे जॉली ग्रँट ते अयोध्याजी दरम्यान हेली सेवा सुरू करण्याची मागणीही विमान वाहतूक मंत्र्यांकडे करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Uttarakhand : प्रभू श्री रामांचे उत्तराखंडशी अतूट नाते, त्यांच्या कृपेनेच जनतेच्या सेवेची संधी मिळाली : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

मुख्यमंत्री म्हणाले की, हल्दवानी आणि डेहराडून ते अयोध्येपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. हे सर्व भगवान श्रीरामांच्या कृपेमुळेच की मी राज्यातील जनतेची सेवा करू शकले आहेत. त्याचप्रकारे मी प्रभू श्री रामांना प्रार्थना करतो की भगवंतांची सेवा करण्याची संधी आम्हाला वारंवार मिळत राहो,असही मुख्यमंत्री धामी म्हणाले.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, आज उत्तराखंडच्या संस्कृतीची झलक केवळ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळते. उत्तराखंडच्या लोकांनी परदेशातही आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लोक परंपरा जिवंत ठेवली आहे. या कार्यक्रमाला आमदार बंशीधर भगत, आयुक्त कुमाऊं दीपक रावत, तसेच लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.