CM Pushkar Singh Dhami: रक्षाबंधनाचे औचित्य साधत धामींनी केले २६ योजनांचे लोकार्पण..

Women tied Rakhi to Dhami in large numbers: माता-बहिनींनी दिलेल्या आशीर्वादामुळे स्वत:ला उत्साहित व भाग्यवान समजतो.
CM Dhami on Rakshabandhan
CM Dhami on RakshabandhanSakal
Updated on

Uttarakhand: राखी पौर्णिमेनिमीत्त चंपावतमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. महिलांनी मोठ्या संख्येने धामींना राखी बांधली व त्यांच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली. रक्षाबंधनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांनी ३९१६.८५ लाखांच्या २६ नव्या योजनांचं लोकार्पण तसेच पायाभरणी केली आहे. यामध्ये २५१०.९५ लाखांच्या १३ योजनांचं लोकार्पण तर १४६५.९० लाखांच्या १३ योजनांची पायाभरणी यांचा समावेश आहे.

उत्तम काम करणाऱ्या महिलांचा केला सन्मान...

मुख्यमंत्र्यांनी विभिन्न योजनांच्या आधारावर लाभार्थी महिलांना चेकचे सुद्धा वाटप केले. सोबतच राज्यामध्ये उत्तम काम करत असणाऱ्या महिलांचा सन्मान देखील केला. महिला स्वयं सहायता गटाने स्थानिक उत्पादनांपासून हस्तनिर्मीत केलेल्या वस्तुंना अधिमुल्यन केले आहे.

धामींनी सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या. ते म्हणाले, "चंपावक हे माझं घर आहे. येथील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबासारखी आहे. मी कोणत्याही परिस्थितीध्ये माझ्या कुटुंबियांसोबत कायम उभा असणार आहे. माता-बहिनींनी दिलेल्या आशीर्वादामुळे स्वत:ला उत्साहित व भाग्यवान समजतो."

CM Dhami on Rakshabandhan
Raksha Bandhan : रक्षाबंधनानिमित्त प्रियांका गांधींनी शेअर केला लहानपणीचा फोटो, राहुल गांधींसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

पीएम मोदींच्या नेतृत्वामध्ये झाली सर्वाधिक कामे...

मुख्यमंत्री म्हणाले, "आज उत्तराखंडामधील स्त्रीशक्ती सर्वात पुढे आहे. स्वयं सहायता गटाचे उत्पादन हे मल्टीनॅशनल कंपनीला देखील मागे सोडत आहे." मुख्यमंत्री सशक्त बहिण योजनेंतर्गत महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंना योग्य भाव मिळावा यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध केला जाईल, असे देखील सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महिला सशक्तीकरणासाठी असलेले सर्वाधिक कार्य हे चंपावत मध्ये झालेले आहे. मुलींच्या स्वप्नांना पंखबळ देण्यासाठी 'बेटी बचावो बेटी पढाओ' या कार्याचा शुभारंभ केला आहे. धामी म्हणाले, आज स्त्रीशक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव मोठे करत आहे. शेतीमधील कामांपासून ते अंतरात झेप घेण्यापर्यंत स्त्रीयांनी आपली छाप सोडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.