उत्तराखंड काँग्रेसने केली माजी प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी; भाजपप्रवेशाची शक्यता

उत्तराखंड काँग्रेसने केली माजी प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी; भाजपप्रवेशाची शक्यता
Updated on
Summary

पक्षविरोधी काम केल्यानं त्यांना काँग्रेसने पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकलं आहे.

डेहराडून - उत्तराखंड (Uttarakhand) काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय (Kishor Upadhyay) यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी काम केल्यानं त्यांना काँग्रेसने (Congress) पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकलं आहे. त्यांना आधीच पक्षाच्या सर्व पदावरून हटवण्यात आलं होतं. किशोर उपाध्याय हे आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

उत्तराखंड काँग्रेसने केली माजी प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी; भाजपप्रवेशाची शक्यता
Punjab Election : पंजाबमध्ये काँग्रेसकडून डझनभर उच्चशिक्षित उमेदवारांना संधी

काँग्रेस प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव यांनी किशोर उपाध्याय यांना सर्व पदावरून हटवण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. यात म्हटलं होतं की, उत्तराखंडचे लोक बदलासाठी उत्सुक आहेत आणि भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी वाट बघत आहेत. भाजपच्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राग आहे. या पत्रात असंही म्हटंल आहे की, उत्तराखंडची देवभूमी आणि इथल्या लोकांची सेवा करण्याचं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()