Haridwar Case: १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; मदतीसाठी प्रियकराकडे गेली, त्यानेही लचके तोडले; हत्येच्या घटनेनं देश हादरला

Uttarakhand Crime: अल्पवयीन मुलगी असल्याने आपल्याविरोधात पोलीस तक्रार दाखल होऊ शकते, असे अमित आणि त्याच्या कुटुंबियांना लक्षात आले आणि तिथूनच पीडित मुलीच्या हत्येचा कट रचला गेला.
Uttarakhand Crime
Uttarakhand Crime Esakal
Updated on

सोमवारी २४ जूनची पहाट.. हरिद्वार येथील नामांकित आयूर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूटजवळ १३ वर्षांच्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता... रात्री अंधारात एखाद्या कारखाली सापडून तिचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांना वाटले.. त्यांनी घटनेची माहिती उत्तराखंड पोलिसांना दिली. पोलीस तपासात हा मृतदेह शांतरशाह गावातील मुलीचा असल्याचे उघड झाले आणि भाजपचा पदाधिकारी, दगाबाज प्रियकर, त्याचे वासनांध मित्र या सर्वांनी मिळून एका मुलीचा कसा जीव घेतला याचा अंगावर शहारे आणणारा घटनाक्रमच समोर आला.

हरिद्वारजवळील शांतरशाह गावातील १३ वर्षांची मुलगी मित्राच्या वाढदिवासाठी बाहेर जाते, असं सांगून घरातून निघाली. रात्री ११ वाजता आईने तिला फोन केला. पण मोबाईल फोन स्विच ऑफ आला. आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आईने मुलीचा मित्र अमितला फोन केला. अमितने ती वाढदिवसाच्या पार्टीला गेली आहे, उद्या सकाळी घरी येईल असे सांगितले.

सकाळी मुलगी घरी न आल्याने आईने शोधाशोध केली. सकाळी ती आदित्य राज सैनी याच्या घरी गेली. आदित्य हा भाजपचा पदाधिकारी असून ओबीसी महामंडळाचा सदस्यही होता. त्याने ‘सध्या पोलिसांकडे तक्रार दाखल करू नका’ असं त्या मुलीच्या आईला सांगितले. हताश झालेली आई घरी परतली.

संध्याकाळी तिला आदित्यचा फोन आला. तुमच्या मुलीचा हरिद्वारजवळ रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे आदित्यने सांगितले. मुलीच्या मृत्यूमुळे आईला मानसिक धक्का बसला होता. अमित गेल्या सहा महिन्यांपासून मुलीचे शोषण करत होता आणि त्यानेच मुलीची हत्या केली असावी, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला.

Uttarakhand Crime
Viral Video: "मी अंधभक्त होतो अन् अंधभक्ताला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे," भाजप समर्थक का झाला हतबल?

मद्यपान आणि सामूहिक बलात्कार

अमित सैनी हा आदित्य सैनीचा चूलत भाऊ आहे. अमितचे गावातील १३ वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या कुटुंबियांनाही अमितने धमकावले होते.

रविवारी संध्याकाळी अमितचा मित्र नितीन (वय २०) याने मुलीला भेटण्यासाठी कॉल केला. नितीन बाईकवरून त्या मुलीला घेऊन निघाला. महामार्गावर तुषार (वय २०) आणि मौसम (वय १९) हे दोघे जण भेटले. तिथून चौघेही मद्यपानासाठी निर्जनस्थळी गेले. तिथे मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

रात्री उशिरा पीडित मुलगी रडत रडत तिचा प्रियकर अमितच्या घरी गेली. अमितनेही तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी असल्याने आपल्याविरोधात पोलीस तक्रार दाखल होऊ शकते, असे अमित आणि त्याच्या कुटुंबियांना लक्षात आले.

तिथूनच पीडित मुलीच्या हत्येचा कट रचला गेला. अमित आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडितेला अमानूष मारहाण केली. ती बेशुद्ध झाल्यावर अमित तिला कारमधून महामार्गावर घेऊन गेला. महामार्गावर तिला कारसमोर ढकलून दिले आणि तिथून पळ काढला.

Uttarakhand Crime
NEET: "12वीच्या गुणांवर प्रवेश द्या अन् नीट परीक्षा कायमची रद्द करा..." PM सह आठ मुख्यमंत्र्यांना कोणी लिहिले पत्र?

राजकारण आणि आरोपप्रत्यारोप

उत्तराखंडमधील या घटनेत भाजपाच्या पदाधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने काँग्रेसने टीकेची झोड उठवली. शेवटी आदित्य सैनीला पक्षातून निलंबित करण्यात आले असून ओबीसी महामंडळातूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित सैनीला गुन्ह्याची माहिती होती, मात्र पोलिसांपासून माहिती लपवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.